AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Chart : हाईट 5’4″ आहे तर वजन किती असायला पाहिजे ? परफेक्ट बॉडीसाठी सिंपल चार्ट पाहा

जर तुमची उंची अमूक आहे तर वजन किती असायला हवे याचे प्रमाणीकरण केलेले आहे. यास बॉडी मास इंडेक्स ( BMI ) असे म्हणतात. परफेक्ट बॉडीसाठी हा एक सिंपल चार्ट पाहूयात...

Weight Chart : हाईट 5'4″ आहे तर वजन किती असायला पाहिजे ? परफेक्ट बॉडीसाठी सिंपल चार्ट पाहा
Follow us
| Updated on: Mar 04, 2025 | 3:57 PM

आपले वजन हे आपल्या उंचीच्या प्रमाणात किती असायला हवे, असा सवाल नेहमीच आपल्या मनात येत असतो. असे अनेक लोक आपण पाहातो ज्यांचे वजन त्यांच्या उंचीला मेळ खात नाही. लठ्ठपणा कमी करून फिट राहण्यासाठी वजनाला उंचीनुरुप असणे महत्वाचे असते. बॉडीचे वजन उंचीनुसार परफेक्ट असण्यासाठी आपण BMI फॉर्म्युल्याचा वापर करीत असतो. उंचीनुसार आदर्श वजन असण्यासाठी व्यक्तीचे लिंग आणि बॉडी टाईप आणि फिटनेसवर अवलंबून असते. परंतू बॉडी मास इंडेक्स (BMI) च्या आधारे एक सरासरी वजन मर्यादा निश्चित करण्यात आले आहे.

भारतात एक सरासरी पुरुषांची सरासरी उंची ५ फूट ५ इंच ( १६५ सेमी ) मानली जाते. तर महिलांची सरासरी उंची ५ फूट ०.५ इंच ( १५३ सेमी) पर्यंत असते. १८ ते २० वर्षांच्या वयापर्यंत शरीराची उंची वाढत असते. पोषण आणि जेनेटिक्स आणि लाईफस्टाईल यांचा उंचीवर प्रभाव पडत असतो.

परफेक्ट बॉडीसाठी…

परफेक्ट बॉडीसाठी आपल्या आहारात प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅटचे सेवन करणे आवश्यक आहे. रोज चालायला जाणे, योगासने किंवा एक्सरसाईज करणे याच्या मदतीने बॉडीला एक्टीव्ह ठेवणे, हायड्रेट राखणे याद्वारे वजन कमी करणे. बॉडी हायड्रेट राखण्यासाठी रोज दोन लीटर पाणी पिणे आणि योग्य प्रकारे झोपणे आवश्यक असते. दररोज सात ते आठ तासांची झोप घेतल्याने मेटाबॉलिझ्म योग्य राहाते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहाते. आता सवाल हा आहे की उंची प्रमाणे वजन किती असालया हवे आहे.

हे सुद्धा वाचा

५’४″ (१६२ सेमी) उंचीच्या महिलांसाठी योग्य वजन ५० – ५९ किलोग्रॅम असणे गरजेचे असते

५’४″ (१६२ सेमी) हाईटच्या पुरुषांसाठी आदर्श वजन – ५७-६६ किलोग्रॅम असणे गरजेचे आहे.

चला तर पाहूयात उंचीच्या प्रमाणात पुरुष आणि महिलांमध्ये योग्य वजन किती असायला हवे.?

लांबीनुसार वजनाचा तक्ता   
लांबी ( फूट आणि इंच )लांबी (सेमी)महिलांसाठी योग्य वजन (किलोग्रॅम) पुरुषांसाठी योग्य वजन (किलोग्रॅम)
4’10”14741 – 5243 – 54
5’0″152 44 – 55 47 – 59
5’2″157 49 – 6352 – 65
5’4″16353 – 67 56 – 70
5’6″16856 – 71 56 – 71
5’8″17359 – 75 65 – 81
5’10” 17863 – 7970 – 86
6’0″183 67 – 8374 – 91