Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यायाम आणि डायट फॉलो करूनही होत नाही वजन कमी? मग तुम्हीही करत असाल या चुका

तुम्ही तुमच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत आहात का? वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि काटेकोर डायटही घेत असाल पण यानंतरही तुमचे वजन कमी होत नाही असे अनेक वेळा होते. तसे असल्यास तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही सामान्य चुका करत आहात. ज्यामुळे त्या चुकांमुळे वजनात कोणताही बदल होत नाही जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या चुका ज्यांच्यामुळे वजन कमी होत नाही.

व्यायाम आणि डायट फॉलो करूनही होत नाही वजन कमी? मग तुम्हीही करत असाल या चुका
exerciseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 5:54 PM

आजच्या काळात तंदुरुस्त आणि निरोगी राहणे ही प्रत्येकाची प्राथमिकता आहे. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायाम आणि निरोगी आहाराचा अवलंब करतात. परंतु अनेक वेळा असे घडते की कठोर परिश्रम करून आणि आहार योजनेचे पालन करून देखील वजनात कोणताही बदल दिसून येत नाही. ही परिस्थिती केवळ निराशा जनकच नाही तर कधी कधी आपला आत्मविश्वास गमवणारीही असते. जर तुम्हाला ही वजन वाढीच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर असे होऊ शकते की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही चुका करत आहात ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम आणि आहार एवढेच पुरेसे नसते तर त्यामध्ये योग्य सवयींचा देखील समावेश असतो. आठ तासांची झोप आणि मानसिक शांती यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. आज जाणून घेऊ त्या सामान्य चुकांबद्दल जे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावतात.

योग्य रित्या कॅलरी न मोजणे

वजन कमी करण्यासाठी आपण घेत असलेल्या कॅलरीस पेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे महत्त्वाचे आहे. परंतु अनेक वेळा लोक कॅलरी मोजण्यातच चुका करतात किंवा आरोग्यदायी पदार्थांचे जास्त सेवन करतात त्यामुळे वजन कमी होत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या योग्य प्रमाणाकडे लक्ष द्या. कॅलरी मोजण्यासाठी ॲप्स किंवा डायरी वापरा. जेणेकरून तुम्ही योग्य प्रमाणात कॅलरीचे नियोजन करू शकतात.

प्रोटीनची कमी

वजन कमी करण्यात प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात. हे केवळ स्नायूंना बळकट करत नाही तर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागण्यापासून थांबवतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. परंतु जर प्रोटीन ची कमतरता असेल तर तुमचे वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावते. शक्य असल्यास तुमच्या आहारात अंडी, कडधान्य, काजू आणि दही सारख्या प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करा. यासोबतच दिवसाची सुरुवात प्रोटीन असलेल्या नाष्ट्याने करा.

दुपारच्या जेवणानंतर झोपणे

दुपारी जेवणानंतर झोपण्याच्या सवयीमुळे वजन वाढू शकते. बरेच लोक दुपारी जेवल्यानंतर झोपतात. जेवल्यानंतर आपले शरीर अन्न पचवण्याची आणि त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू करते. या काळात तुम्ही लगेच झोपल्यास ही प्रक्रिया मंदावते आणि शरीरात चरबीच्या रूपात जास्त कॅलरीज जमा होऊ लागतात.

पाणी कमी पिणे

पाण्याच्या कमतरतेमुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील चयापचय क्रिया नीट होत नाही आणि भुकेचे भावनाही वाढू शकते. त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जेवण करण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

व्यायामात विविधतेचा अभाव

रोज त्याच प्रकारचा व्यायाम केल्याने शरीराला त्याची सवय होते. त्यामुळे कॅलरी बर्न करण्याची क्षमता कमी होते. तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये विविधता आणा. कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि योगासने एकत्रित करून व्यायाम करा.

'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल.
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज.
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम.
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या.
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल.
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?.
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन.
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार.