कढीपत्त्याचे पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो
हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो कारण यात अनेक औषधी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडेंट्स आहेत जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्ही कढीपत्त्याचं पाणी प्यायलं आहे का आणि ते आरोग्यासाठी नक्की चांगलं आहे की नाही?
मुंबई: कढीपत्त्याचा सुगंध आणि त्याची चव सर्वांनाच आकर्षित करते. सांबार, डोसा आणि नारळाची चटणी यासारख्या दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये याचा सर्रास वापर केला जातो. हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो कारण यात अनेक औषधी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडेंट्स आहेत जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्ही कढीपत्त्याचं पाणी प्यायलं आहे का आणि ते आरोग्यासाठी नक्की चांगलं आहे की नाही? भारताचे प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स म्हणाले की, कढीपत्त्याचे पाणी आपल्याला अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकते, त्याचे फायदे जाणून घेऊया.
कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे फायदे
कढीपत्त्याच्या पाण्याचा वापर वजन कमी करणारे पेय म्हणूनही केला जाऊ शकतो, याच्या सेवनाने लठ्ठपणा तर कमी होतोच, शिवाय कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते, मात्र त्याचा परिणाम काही दिवसांनंतरच दिसेल.
ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी कढीपत्ता अवश्य खावा. कढीपत्ता आपल्या पोटाचे आरोग्य चांगले ठेवतात. ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, अतिसार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
कढीपत्त्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, खरं तर या पानांमध्ये असणारे अँटी-ऑक्सिडेंट्स शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन, त्वचेच्या समस्या आणि फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो.
सध्याच्या युगात अनेकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे, यामागे प्रेम आणि मैत्रीतील फसवणूक, कामाचा ताण, पैशांची कमतरता, आजारपण अशी अनेक कारणे असू शकतात. मात्र कढीपत्त्याचे पाणी प्यायल्यास टेन्शन कमी होण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होईल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)