Acidity: सतत ॲसिडिटी झाल्यास काय नुकसान होऊ शकते ?
ॲसिडिटी ही पचनासंबंधीची सामान्य समस्या आहे. तेलकट, अति मसालेदार असे पदार्थ खाणाऱ्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो.
नवी दिल्ली – ॲसिडिटी ही पचनासंबंधीची सामान्य समस्या आहे. हा त्रास कोणालाही होऊ शकतो. जे लोक तेलकट, अति मसालेदार असे पदार्थ खातात, त्यांना ॲसिडिटीचा (acidity problem) त्रास होऊ शकतो. ॲसिडिटीमुळे पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे तसेच कधीकधी पोटात वेदना (stomach pain) होणे असा त्रासही होतो. ॲसिडिटी होणे हे सामान्य असले तरीही वारंवार असा त्रास झाल्यास तुम्हाला इतर आजार (health problems) होण्याचाही धोका असतो. ज्यामुळे आपल्या आरोग्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.
वारंवार ॲसिडिटीचा त्रास झाला तर गॅस्ट्रो इसोफेगल डिसीज मध्ये बदलू शकतो. सतत ॲसिडिटी झाल्यास काय नुकसान होऊ शकते, ते जाणून घेऊया.
ॲसिडिटीमुळे होणारे नुकसान
1) वारंवार ॲसिडिटी होत असेल तर त्या व्यक्तीला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. सततॲसिडिटी झाल्यास ग्रासनळी ट्रिगर होते व सूज येते. या अवस्थेला ॲसोफॅजायटिस म्हटले जाते. ही परिस्थिती उद्भवल्यास संबंधित व्यक्तीला अन्न गिळताना फार त्रास होऊ शकतो. तसेच गळ्यात खवखवणे, आवाज कर्क्कश होणे, पोटात जळजळ होणे अशी अन्य लक्षणेही दिसू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास या नलिकेत अल्सर आणि इतर त्रास उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये कॅन्सरचा धोकाही संभवू शकतो.
2) ॲसिडिटी त्रास वारंवार झाल्यास तुम्हाला ॲसोफेगल अल्सरची समस्या होऊ शकते. पोटात असलेले ॲसिड हे ग्रासनलिकेला इजा पोहोचवू शकते, ज्यामुळे ही गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. हा अल्सर झाल्यास आंबट ढेकर येणे, मळमळे, पोटात जळजळ होणे, मलत्याग करताना रक्त येणे, अशी लक्षणे दिसू शकतात. प्रत्येक व्यक्तीची लक्षणे समान नसतात.
3) ॲसिडिटीचा त्रास झाल्यामुळे ॲसिड तुमचा गळा व तोंडापर्यंत पोहोचल्यास, हे ॲसिड फुप्फुसांमध्येही प्रवेश करू शकते. अशा परिस्थितीमध्ये ॲस्पिरेशन न्युमोनिया होण्याचा धोका संभवतो. फुप्फुसात संसर्ग झाल्यास ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत वेदना, थकवा आणि काही वेळेस त्वचेचा रंग बदलणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर नियमितपणे डॉक
ॲसिडिटीपासून कसा करावा बचाव ?
– मसालेदार तसेच तेलकट, अति तिखट असे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
– आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.
– संपूर्ण दिवसभरातील आहार छोट्या-छोट्या भागात विभागून सेवन करावा.
– भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवावे.
– अन्न चावून चावून सावकाश खावे.
– जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी 3 तासांचे अंतर ठेवावे.
– वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त फॅटमुळेही ॲसिडिटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
– मद्यपान व धूम्रपान करू नये. कॅफेनचे अतिरिक्त सेवन टाळावे
– तुळशीची पाने, लवंग, बडीशोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.