दिवसभरात तुम्ही 3 पेक्षा जास्त कप चहा पिता का? मग तुम्हाला त्याचे परिणाम माहिती असायलाच हवेत, वाचा!

चहामुळे ताजेपणा आणि आराम मिळतो. पण कुठल्याही आवडत्या गोष्टीचं योग्य प्रमाणात सेवन असावं, व्यसन कधीही वाईटच. काही लोकांना चहा पिण्याचे व्यसन असते, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक कप चहा पितात. अशा लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की जास्त चहाचे सेवन केल्याने आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते.

दिवसभरात तुम्ही 3 पेक्षा जास्त कप चहा पिता का? मग तुम्हाला त्याचे परिणाम माहिती असायलाच हवेत, वाचा!
Tea loverImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 3:38 PM

मुंबई: भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही, इथे अनेकांना दिवसाची सुरुवात चहानेच करायची असते. चहाची चुस्की घेतली नाही लोकांना डोकेदुखी आणि थकवा सहन करावा लागतो. चहामुळे ताजेपणा आणि आराम मिळतो. पण कुठल्याही आवडत्या गोष्टीचं योग्य प्रमाणात सेवन असावं, व्यसन कधीही वाईटच. काही लोकांना चहा पिण्याचे व्यसन असते, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक कप चहा पितात. अशा लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की जास्त चहाचे सेवन केल्याने आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते. ग्रेटर नोएडाच्या जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, आपण एका दिवसात किती कप चहा प्यायला हवा.

दिवसभरात किती कप चहा प्यावा?

आपल्या सर्वांना माहित आहे की चहामध्ये कॅफिन असते, जे आरोग्यासाठी हानिकारक असते. तसं पाहायला गेलं तर हे चहा पत्तीच्या पानांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते, कोणत्या ब्रँडमध्ये किती कॅफिन असेल. सहसा, एक कप चहामध्ये सुमारे 60 मिलीग्राम कॅफिन असते. यानुसार दिवसभरात 3 कपपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

जर तुम्ही दिवसातून 4 किंवा त्यापेक्षा जास्त कप चहा प्यायलात तर या पेयामध्ये असलेले टॅनिन शरीरातील लोह शोषून घेण्याची क्षमता कमी करते. जे शाकाहारी आहेत, त्यांच्या चहाच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

चहामध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते, ज्याचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येऊ शकते, म्हणून बहुतेक आरोग्य तज्ञ जास्त प्रमाणात चहाचे सेवन टाळण्याचा सल्ला देतात.

दिवसातून 5 ते 10 कप चहा प्यायल्यास ॲसिड रिफ्लक्सची समस्या वाढते, ज्यामुळे तुमची छाती दुखू शकते. त्यामुळे आपल्या छंदावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

झोपेची कमतरता

चहा तुम्हाला फ्रेशनेस देतो जेणेकरून तुम्ही दिवसातील महत्वाची कामे टेन्शन फ्री करू शकता, पण जर तुम्ही सारखाच चहा प्यायलात तर झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.