काय सांगता…तीस वर्षाच्या तरुणाचे वजन 180 किलो.. रोज खातो 80 चपात्या.. 2 किलो मटन..अन् 3 किलो भात…! जाणून घ्या नेमकी काय आहे भानगड

बिहारमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे वजन 180 किलो आहे आणि वय 30... 30 वर्षे आहे. त्याला बुलिमिया नर्वोसा नावाचा खाण्याचा विकार आहे, ज्यामुळे तो नेहमी भुकेलेला असतो. बुलिमिया नर्वोसा म्हणजे काय? त्याची लक्षणे काय आहेत? त्यावर उपचार कसे करता येतील? जाणून घ्या सविस्तर माहिती.

काय सांगता...तीस वर्षाच्या तरुणाचे वजन 180 किलो.. रोज खातो 80 चपात्या.. 2 किलो मटन..अन् 3 किलो भात...! जाणून घ्या नेमकी काय आहे भानगड
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 3:20 PM

प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची खाण्याची सवयही वेगळी असते. काही लोकांना हेल्दी फूड तर काहींना जंक फूड आवडते. काही लोकांना लहान भागांमध्ये तर काहींना दिवसातून दोनदाच खायला आवडते. खाण्याच्या सवयीमुळे (Due to eating habits) अनेकदा लोकांचे वजन वाढते किंवा कमी होते. या असामान्य खाण्याच्या सवयींना खाण्याचे विकार म्हणतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये, खाण्याच्या विकारामुळे, एखाद्या व्यक्तीचे वजन इतके वाढते की वजनावर नियंत्रण (Weight control) ठेवणे आवश्यक होते. अन्नाच्या या हव्यासापोटी बिहारमधील रफीक नामक एका तीस वर्षीय युवकाचे वजन तब्बल 180 किलो झाले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याने आपले वाढलेले वजन आणि सतत लागणाऱया भुकेच्या समस्येबद्दल (problem of hunger) सांगितले आहे. या व्यक्तीच्या वाढलेल्या वजनाबद्दल डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीचे वजन कोणत्यातरी खाण्याच्या विकारामुळे वाढले आहे. हा खाण्याचा विकार काय आहे? वजन कमी कसे करावे? याबाबत डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली आहे.

कोण आहे हा व्यक्ती आणि का वाढले त्याचे वजन

मोहम्मद रफिक अदनान असे या 180 किलो वजनाच्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा बिहारमधील कटिहारचा आहे. त्यांचे वय अवघे ३० वर्षे आहे. रफिक सांगतो की, माझे वडील गोदामात काम करायचे आणि आई घरीच असायची. आम्ही 10 भावंडे असून त्यात 6 बहिणी आणि 4 भाऊ आहेत. मी सर्वात लहान आहे. मी इयत्ता 5वी पर्यंत शिकलो. मला आठवतं की मी 15 वर्षांचा होतो तेव्हाही माझं वजन 80 किलो होतं. पण त्यावेळी वजन जास्त नसल्यामुळे मी खेळायचो. मग हळूहळू माझी भूक वाढली आणि माझे वजनही वाढले. आता माझे वजन 180 किलो आहे आणि मी 20-30 पावलेही चालू शकत नाही. मी चालण्याचा प्रयत्न करताच, मला थकवा येतो आणि मग मला खाली बसावे लागते. थकव्यामुळे मला कधी डॉक्टरकडे जावे लागले तर मी मोटार सायकलने जातो पण कधी कधी गाडी सुद्धा माझे वजन उचलू शकत नाही. मी दिवसभर गावातील लोकांशी बोलत राहतो आणि घराबाहेर बेडवर पडून राहतो.

हे सुद्धा वाचा

रफिक खातो 80 चपात्या अन् 3 किलो भात

रफिकने सांगितले की, मी दिवसातून ३ वेळा जेवतो. मला एवढी भूक लागते की, मी एकटाच संपूर्ण कुटुंबाच्या 10 पट अन्न खाऊ शकतो. आमच्या कुटुंबात 1 पोती तांदूळ (50 किलो) क्वचितच सात दिवस टिकतो. मी एकटा रोज २-३ किलो भात खातो. यासोबत मी 2 लिटर दूध, 1-2 किलो मटण किंवा चिकनही खातो. मी साधारण ३-४ किलो पिठाची भाकरी खातो. म्हणजेच रफिक एका दिवसात 4 किलो मैद्यापासून बनवलेल्या सुमारे 80 चपात्या खातो. तांदळाबद्दल बोलायचे झाले तर, 6 लोकांच्या कुटुंबात 1 किलो तांदूळ देखील खूप आहे आणि इथे रफिक एकटा 2-3 किलो तांदूळ खातो.

या खाण्याच्या विकारामुळेच एवढी भूक लागते

मुंबई येथील फोर्टिस रुग्णालयातील सल्लागार-मानसोपचारतज्ज्ञ डॉ. फॅबियन आल्मेडा यांनी सांगीतले की, रफीक ला खाण्याचा विकार आहे. कोणताही खाण्यापिण्याचा विकार हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती कधी कधी गरजेपेक्षा जास्त खाते तर कधी गरजेपेक्षा कमी खाते. डॉ. फॅबियन पुढे म्हणाले की, खाण्याच्या विकाराचे दोन प्रकार आहेत, ज्यांची प्रकरणे समोर येत आहेत. एनोरेक्सिया नर्वोसा आणि बुलिमिया नर्वोसा दोन्ही विकारांमध्ये मोठा फरक आहे. एनोरेक्सिया नर्वोसामध्ये, रुग्णाला स्वतःला बारीक ठेवायचे असते आणि त्यासाठी तो खूप कमी खातो. खूप विचारपूर्वक, कॅलरीजची काळजी घेतो. त्याला नेहमी वजन वाढण्याची चिंता असते आणि त्यामुळे त्याचे वजन कमी होते. तर बुलिमिया नर्वोसामध्ये, रुग्णाचे लक्ष सर्व वेळ खाण्यावर केंद्रित असते, परंतु खाल्ल्यानंतर त्याला त्याच्या वाढलेल्या वजनाची लाजही वाटते. मग तो वजन कमी करण्यासाठी स्वतःला अधिक शारीरिक हालचालींसाठी भाग पाडतात.

बुलिमिया नर्वोसा आजाराची लक्षणे

  1. – नेहमी भूक लागते
  2. – अन्न उपलब्ध नसताना तणावग्रस्त होणे
  3. – वजन वाढण्याची भीती
  4. – खाण्यावर नियंत्रण नाही
  5. – स्वतःला उलट्या करण्यास भाग पाडणे
  6. – काही वेळा खाण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे
  7. – हर्बल सप्लिमेंट्स घेणे

अशाप्रकारे होऊ शकते रफिकचे वजन कमी

डॉ. फॅबियन पुढे म्हणाले, रफिक दिवसभर बेडवर पडून राहतो आणि कोणतेही काम करत नाही, त्यामुळे अनेक नकारात्मक गोष्टींनी त्याला घेरले असावे. रफिकने वजन कमी करण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे त्याला सकारात्मक विचारांकडे वळविने होय. म्हणजे त्याने मनात विचार केला तरी त्याला यश मिळू शकते. जर द्रव पदार्थ खाऊन, कमी कॅलरी,कमी उष्मांक खाऊन, प्राणायाम करून, जर त्याचे वजन 180 ते 179 किलो असेल, तर ती यशाची पहिली पायरी असेल. यासाठी कुटुंब, समाज, काही डॉक्टर आणि तज्ज्ञांनी त्याला प्रेरित करावे लागेल, तरच तो आपले वजन कमी करू शकेल. याचे कारण असे की रफिकने फक्त पाचवीतच शिक्षण घेतले आहे आणि त्याला खाण्याच्या सवयी, चुकीचे खाणे, योग्य खाणे इत्यादींबद्दल काहीच माहिती नसेल. जेव्हा एखादा विशेषज्ञ त्याला समजावून सांगेल, तेव्हा कुठेतरी तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल. Aajtak.in ने घेतलेल्या मुलाखतीत रफिक ने आपल्या वाढत्या वजनाबाबत खुलासा केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.