जंगलात जिवंत साप-विंचू खाणारा ‘डिस्कव्हरी हिरो’ घरी काय खातो? ‘अशी’ होते बेअरग्रिल्स्‌ च्या दिवसाची सुरवात!

सरसकट संपूर्ण कुटुंबाची पहिली पसंत ‘डिस्कव्हरी’ चॅनल वरील 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' होय. या शो चा हिरो बेअर ग्रिल्स या ब्रिटिश तरुणाचा पर्वत, जंगल, वाळवंट भ्रमंतीचा थरारक प्रवास सर्वांनाच आवडतो कारण..वैज्ञानिक दृष्ट्या मानवाला कुठल्याही साधन सुविधांशिवाय कसे जगता येईल याचे वास्तव आधारीत मालिका मधून डिस्कव्हरी चॅनलचा हिरो बेअरग्रिल्स केव्हा जगप्रसिद्ध झाला हे कुणालाही कळले नाही. त्याने हिमालय सर केला, सहारा वाळवंट भटकला. साप-विंचू मासे, घोरपडीसह जीवजंतू खाऊन जंगलात राहणारा बेअर ग्रिल्सने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आहार आणि वर्क आउटबद्दल सांगितले.

जंगलात जिवंत साप-विंचू खाणारा ‘डिस्कव्हरी हिरो’ घरी काय खातो? ‘अशी’ होते बेअरग्रिल्स्‌ च्या दिवसाची सुरवात!
Bear Grylls Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 5:13 PM

‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या सर्वात लोकप्रिय शो मधून जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या ‘बेअर ग्रिल्स’(Bear Grylls) ला प्रत्येकजण ओळखतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, पंतप्रधान पीएम मोदी, अक्षय कुमार, रणवीर सिंग यांच्यासह अनेक हॉलिवूड सेलिब्रिटीही त्यांच्या शो चा भाग बनले आहेत. त्याच्या साहसी जीवनशैलीसाठी (adventurous lifestyle) प्रसिद्ध, बेअर ग्रिल्स जिवंत कीटक, विंचू, साप खातांना दाखवले आहे. बेअर ग्रिल्सने नुकतीच एक मुलाखत दिली, त्यात त्याने आपल्या डाएट आणि वर्कआउटबद्दल सांगितले. बेअर ग्रिल्स, जो जंगलात शूट करतो आणि खूप शारीरिक हालचाली (Lots of physical activity) करतो. बेअर ग्रिल्सचे खरे नाव एडवर्ड मायकेल ग्रिल्स आहे आणि त्याचा जन्म 7 जून 1974 रोजी लंडनमध्ये झाला. त्याला इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच आणि अमेरिकन भाषा येते. लहानपणी बेअरने स्कायडायव्हिंग शिकले आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला. बेअर ग्रिल्स यांनी ब्रिटिश सैन्यात तीन वर्षे सेवा केली आहे. 2004 मध्ये, त्याला रॉयल नेव्ही रिझर्व्हमध्ये लेफ्टनंट कमांडरचा दर्जा देण्यात आला.

तो फक्त मासांहार करतो

बेअर ग्रिल्सने 1998 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न पूर्ण केले. 18 महिन्यांनंतर, पॅराशूट ग्लाइडिंगच्या वेळी बेअर ग्रिल्स याच्या पाठीचा कणा मोडला पण त्याने स्वतःला त्याच्या छंदाने पुन्हा जीवनात उभे केले. त्याने आतापर्यंत अनेक टीव्ही-शो केले आहेत. बिझनेस-इन-साइडरच्या म्हणण्यानुसार, बेअर ग्रिल्स पूर्वी शाकाहारी होता. पण, आता तो कधीही भाज्या खात नाही आणि नेहमी मांसाहारच घेतो. जेव्हापासून त्याने मांसाहारी पदार्थ खाण्यास सुरवात केली तेव्हापासून तो शाकाहारी विरोधी झाला आहे. आणि मुलाखतीदरम्यान दावा केला होता की कच्च्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.

भाज्या शरीरासाठी चांगल्या नाहीत

बेअर ग्रिल्स पुढे म्हणाले, “जेव्हा मला कोविड-19 झाला होता, तेव्हा मी भरपूर रस आणि भाज्या घ्यायचो. असे केल्याने माझी किडनी दुखू लागली. जेव्हा तुम्ही लघवी थांबवता किंवा किडनी स्टोन होतो तेव्हा किडनी दुखते.” अर्थात काहीतरी चुकतयं, या दोन्ही समस्या डिहायड्रेशनमुळे किंवा जास्त सोडियमयुक्त आहार घेतल्याने होतात. माझा विश्वास आहे की, भाज्या मानवी शरीरासाठी चांगल्या नाहीत. जेव्हा बेअर ग्रिल्स साहसी सहलीवरून परत जातो तेव्हा तो, प्रथम घरी जातो आणि बर्गर खातो. बर्गरमध्ये चीज, अंडीही टाकतात. यासोबत ते एक चमचा बोन मॅरो, ग्रीक दही, मध आणि बेरी खातो. दरम्यान, मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या ऑफिस फॉर सायन्स अँड सोसायटीमधील संशोधन आहारतज्ञ हेडी बेट्स(Heidi Bates) म्हणाल्या, “भाज्यांमुळे रोग होतात याचा कोणताही पुरावा नाही.” जे लोक भाज्या खातात त्यांना हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह, लठ्ठपणा कमी करण्यासाठी भाज्यांना उपयुक्त मानले जाते. विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोकाही शाकाहार मुळे कमी होत असल्याचे आढळून आले आहे.

हे सुद्धा वाचा

बेअर ग्रिल्सची कसरत(वर्कआऊट)

48 वर्षीय बेअर ग्रिल्सने मुलाखतीत सांगितले की, तो रोज व्यायामही करतो. त्यात जास्त धावत नाही. पण, हृदयाच्या आरोग्यासाठी म्हणून, तो टेनिस खेळतो आणि आठवड्यातून तीन दिवस 30-40 मिनिटे वेट ट्रेनिंग करतो. आठवड्यातून एकदा सकाळी 15 मिनिटे योगा करतो. ज्या दिवशी तो वेट ट्रेनिंग करत नाही, त्या दिवशी तो 500 मीटर धावतो. तो 25 पूल-अप्स, 50 प्रेस-अप, 75 स्क्वॅट्स आणि 100 सिट-अप करतो. बेअर ग्रिल्स पुढे म्हणाले की, जंगलात फिरताना, पाठीवर वजन घेऊन चालताना मी नेहमी थकतो. हे वर्कआउट्स माझी हाडे आणि स्नायू मजबूत ठेवतात आणि लवचिकता देखील राखतात.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.