3 Drinks Theory : 3 ड्रिंक्स थिअरी म्हणजे नेमकं काय? उन्हाळ्यात डिहायड्रेशनची मिटेल चिंता
Summer Season Health Care : पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि शरीराचे तापमान देखील नियंत्रित करते. अशातच उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. अशातच तज्ञांनी 3 ड्रिंक्स थिअरी सांगितले आहेत, ज्यांचे पालन करून तुम्ही शरीर हायड्रेट ठेवू शकता.

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या शरीराला अधिक हायड्रेट ठेवण्याची गरज असते. या वातावरणात आपल्या शरीरातून जास्त घाम येत राहिल्याने शरीर डिहायड्रेट होऊ लागते. याच कारणास्थव आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हायड्रेटेड राहण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दररोज पुरेसे पाणी प्या. जर तुम्ही हायड्रेटेड राहिलात तर तुमची किडनी देखील योग्यरित्या काम करेल.
पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की आपल्या शरीराच्या वजनाच्या 50-70 टक्के वजन पाण्यामुळे असते. पेशी आपल्या शरीरातील बांधकाम घटक आहेत आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी, तुम्ही थ्री ड्रिंक थिअरी फॉलो करू शकता. यामुळे आपल्या शरीराला पोषण तर मिळेलच पण विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत होईल.
पहिली स्टेप पाणी
दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी प्यावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. साध्या पाण्यात शून्य कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे. काही लोकांना साधे पाणी पिणे आवडत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यात बडीशेप, ओवा किंवा लिंबू टाकून ते पिऊ शकता. याशिवाय तुम्ही तुळस, पुदिना आणि चिया बियाणे पाण्यात मिक्स करून देखील ते पिऊ शकता.
दुसरी स्टेप ज्यूस
थ्री ड्रिंक्स थिअरी मध्ये असे सांगतात की तुम्ही तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचे रस देखील समाविष्ट केले पाहिजेत. उन्हाळ्यात फळांचे आणि भाज्यांचे रस प्यायल्याने तुम्ही हायड्रेटेड राहाल. अननस, मोंसबी, डाळिंब, पपई आणि आंब्याचा रस प्यायल्याने शरीराला अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. याशिवाय, तुम्ही टरबूज, खरबूज, काकडी, द्राक्षे, ब्लूबेरी, मुळा, सफरचंद, टोमॅटो आणि बीट यासारख्या गोष्टी कच्च्या खाऊ शकता.
तिसरे स्टेप तुमची निवड
तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पेय पिऊ शकता. पण लक्षात ठेवा की तुम्ही चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. त्यामध्ये कॅफिन असते, जे शरीराला डिहायड्रेट करू शकते. मग तुम्ही लस्सी, दूध किंवा नारळ पाणी पिऊ शकता. तिन्ही ड्रिंक्स हायड्रेटेड मानली जातात. जर तुम्ही चहा किंवा कॉफी पीत असाल तर दिवसातून दोन कपपेक्षा जास्त पिऊ नका.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)