Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा गंभीर आजाराने मृत्यू; काय आहे एमाइलॉयडोसिस आजार? कशामुळे होतो?

Amyloidosis Disease Meaning in Marathi : अमाइलॉइडोसिस कोणत्या प्रकारचा झाला आहे, त्यावरून या आजारावर उपचार केले जातात. या आजारावर कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार उपलब्ध नाहीत. हा आजार झाल्यावर औषधे घ्यावीच लागतात.

पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा गंभीर आजाराने मृत्यू; काय आहे एमाइलॉयडोसिस आजार? कशामुळे होतो?
amyloidosisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 12:38 PM

कराची: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा एमाइलॉयडोसिस या आजाराने मृत्यू झाला आहे. मुशर्रफ या आजाराने गेल्या वर्षभरापासून त्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या वर्षीच्या जून 2022पासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना त्यांना चालता बोलताही येत नव्हते. उपचारालाही त्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. या दुर्धर आजारामुळे अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

काय आहे एमाइलॉयडोसिस?

एमाइलॉयडोसिस हा एक गंभीर आणि दुर्धर आजार आहे. या आजारामुळे हृदय, यकृत, किडनी आणि शरीरातील इतर भागात अमाइलॉइड प्रोटीन तयार होतं. अमाइलॉइडोसिसचे अनेक प्रकार आहेत. काही हेरिडेट्री आहेत. दीर्घकाळ डायलिसीस केल्यानेही हा आजार होऊ शकतो. या आजारामुळे शरीरातील अनेक अवयवांवर परिणम होतो.

हे सुद्धा वाचा

अमाइलॉइड प्रोटीन म्हणजे काय?

अमाइलॉइड साधारणपणे शरीरात तयार होत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनमुळे हे तयार होते. अमाइलॉइड हे एक असामान्य प्रोटीन आहे. साधारणपणे बोन मेरोमध्ये ते तयार होते. ते कोणत्याही टिश्यू किंवा अवयवात जमा केले जाऊ शकते.

एमाइलॉयडोसिसची लक्षणे

शरीरातील कोणत्या अवयवांवर परिणाम झाला यावर या आजाराचे लक्षण दिसून येतं. सूज, थकवा, कमजोरी, श्वास घेण्यास त्रास होणे, सुन्न वाटणे, हातापायात दुखणे आदी या आजाराची लक्षणे आहेत.

1. गुडघे आणि पायांना सूज राहणे

2. श्वसनास त्रास होणे

3. थकवा आणि कमजोरी वाटणे

4. श्वसनास त्रास होत असल्याने बेडवर सरळ झोपता न येणे

5. त्वचा बदलणे, त्वचा जाड होणे किंवा किरकोळ गोष्टीमुळेही दुखापत होणे, डोळ्याच्या चारही बाजूंनी डाग पडणे

6. हृदयाची धडधड वाढणे

एमाइलॉयडोसिसवरील उपचार

अमाइलॉइडोसिस कोणत्या प्रकारचा झाला आहे, त्यावरून या आजारावर उपचार केले जातात. या आजारावर कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार उपलब्ध नाहीत. हा आजार झाल्यावर औषधे घ्यावीच लागतात. त्याशिवाय किमोथेरेपी किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट हाच याचा पर्याय आहे.

डॉक्टरकडे कधी जाल?

तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांचा वारंवार सल्ला घेतला पाहिजे. अमाइलॉइडोसिसशी संबंधित लक्षणे वारंवार दिसून येत असतील तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवा आणि उपचार सुरू करा.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.