Ectopic Pregnancy: एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय ?
एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजेच अस्थानी गर्भावस्था. या प्रेग्नन्सीमध्ये नेमके काय होते, हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली – एक्टोपिक प्रेग्नन्सी (Ectopic pregnancy) म्हणजेच अस्थानी. ही एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये गर्भाचे गर्भाशयामध्ये रोपण न होता, तो इतर जागी रुजतो. म्हणजेच प्रजननक्षम अंडी ही गर्भाशयाच्या बाहेर कुठेही रोपण होतात. साधरणतः एक्टोपिक प्रेग्नन्सी ही ९०% प्रकरणांमध्ये फॅलोपिअन ट्युब्स (fallopian tube) मध्ये , म्हणजेच गर्भनलिकेमध्ये राहण्याची शक्यता असते. मात्र काही वेळा इतर जागी म्हणजे ओव्हरी , सर्व्हिक्स या ठिकाणी एक्टोपिक प्रेग्नन्सी (pregnancy)राहू शकते. ही प्रेग्नन्सी होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते.
एक्टोपिक प्रेग्नन्सीची लक्षणे काय असतात ?
सामान्य गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये साधरणतः मळमळ व उलट्या होणे या सारखी लक्षणे दिसून येतात. एक्टोपिक प्रेग्नन्सीची लक्षणे ही 4 ते 10 आठवड्यांमध्ये दिसायला लागतात. सुरूवातील एक्टोपिक प्रेग्नन्सी ही काही विशिष्ट लक्षणांसह सामान्य गर्भधारणेसारखी वाटू शकते. इतर काही सामान्य लक्षणे दिसू शकतात. ओटीपोटाच्या एका बाजूला तीव्र वेदना होणे , योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो, तसेच अशक्तपणा जाणवणे, पाठदुखी अशी काही लक्षणे दिसतात.
एक्टोपिक प्रेग्नन्सी वाढत असताना, अधिक गंभीर लक्षणे विकसित होऊ शकतात. मुख्यत: जर फॅलोपियन ट्यूब फुटली तर खालीलपैकी लक्षणे दिसू शकतात – पोटात किंवा ओटीपोटामध्ये अचानक, तीव्र वेदना – खांदा दुखणे – अशक्तपणा, चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे, यापैकी काही लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे , कारण ही परिस्थिती गंभीर होऊ शकते.
एक्टोपिक प्रेग्नन्सीचे मुख्य कारण काय ?
– 40 वर्षांपेक्षा अधिक वय असणे.
– (यापूर्वी) ओटीपोटाची शस्त्रक्रिया झाली असेल
– अंडनलिकेला काही दुखापत झाली असल्यास
– यापूर्वी एक्टोपिक प्रेग्नन्सीचा इतिहास असल्यास
– प्रजननासंदर्भात काही औषधे घेतली असल्यास.
(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)