तुम्हाला आई व्हायचंय?… वंध्यत्व समस्यांवर करा सहज अत्याधुनिक उपचाराने मात!

अनेकदा स्त्री व पुरुष या दोघांना वंध्यत्वाची समस्या त्रास देत असते योग्य वेळी योग्य उपचार जर आपण केले तर या समस्येवर सहजरित्या मात करता येते. आपले मेडिकल सायन्स प्रगत आहे आणि म्हणूनच अनेक अत्यानुधिक पद्धतीने उपचार आपण करून ही समस्या मिटवू शकतो. हे अत्याधुनिक उपचार कोण कोणते आहे या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत...

तुम्हाला आई व्हायचंय?... वंध्यत्व समस्यांवर करा सहज अत्याधुनिक उपचाराने मात!
प्रातिनिधीक फोटो (गुगल)
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 5:40 PM

अनेकदा स्त्री व पुरुष या दोघांना वंध्यत्व (infertility) ची समस्या त्रास देत असते योग्य वेळी योग्य उपचार जर आपण केले तर या समस्येवर सहज रित्या मात करता येते.आपले मेडिकल सायन्स प्रगत आहे आणि म्हणूनच अनेक अत्यानुधिक पद्धतीने उपचार (advance treatment) आपण करून ही समस्या मिटवू शकतो. हे अत्याधुनिक उपचार कोण कोणते आहे याबद्दल अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात त्या प्रश्नाचे निराकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा वंध्यत्वाची समस्या उद्भवते अशा वेळी फक्त स्त्रीला दोष दिला जातो. परंतु अनेकदा पुरुषाच्या शरीरामध्येसुद्धा अनेक असे काही दोष उपलब्ध होतात ज्यामुळे पुरुष सुद्धा वंध्यत्वाच्या समस्येला कारणीभूत ठरतो आणि म्हणूनच स्त्री व पुरुष यांच्या शरीरातील वंध्यत्व जर आपण योग्य वेळी जाणून घेतले आणि त्याच्यावर मेडिकल सायन्स ( medical sciences) च्या आधारावर उपाय केले तर आपल्याला लवकर फरक जाणवू शकतो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण उपचारपद्धती बद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आजच्या या लेखात डॉ. निलेश बलकवडे यांच्याशी बातचित करताना त्यांची अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. तसेच या समस्यांवर आधुनिक उपचार पद्धतीचा वापर करून आपण कायमची समस्या दूर करू शकतो असा विश्वास देखील दिला.

वंध्यत्व म्हणजे काय?

वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी होय. जर लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या आत जर एखाद्या जोडप्याला बाळ होत नसेल किंवा खूप सारे प्रयत्न करून सुद्धा नैसर्गिकरित्या बाळ जन्माला येत नसेल तेव्हा ही समस्या निर्माण होते त्याला वंध्यत्व असे म्हणतात. वंध्यत्वच्या व्याख्या या वेगवेगळ्या असू शकतात. परंतु जर समजा एखाद्या महिलेचे वय 35 वर्षे असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अशा वेळी लवकर गर्भधारणा होत नसेल तर अशा महिलांच्या शरीरामध्ये ही समस्या उद्भवू लागते तसेच सध्याच्या काळामध्ये अनेकदा लग्न उशिरा होत असल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि या सर्वांचा परिणाम गर्भधारणेवर सुद्धा होत असतो असे काही परिणाम तुम्हाला जाणवत असतील तर डॉक्टरांना अवश्य भेट देणे गरजेचे आहे.

महिलांच्या गर्भधारणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी

– स्त्रीच्या अंडाशय मध्ये बिजांची संख्या योग्य हवी.. – संख्या कमी किंवा जास्त असल्यास समस्या निर्माण होते. – गर्भ नलिका ओपन हवी त्यात कोणत्याही प्रकारचा त्रास असता कामा नये – गर्भाशय व्यवस्थित असायला हवे – पुरुषांमध्ये शुक्राणू ची संख्या त्यांची गतिशीलता आणि आकार गरजेचे आहे.

गर्भधारणा न होण्याची कारणे

– स्त्रियांच्या अंडाशयातील बीजांची संख्या वयाआधी कमी होणे – वाढते प्रदूषण – तणावग्रस्त आणि धकाधकीचे जीवन – वय झाल्यावर उशिरा लग्न करणे – पीसीओडी किंवा पीसीओस समस्या – अंडाशयात पाण्याच्या किंवा रक्ताच्या गाठी तयार होणे – गर्भ नलिकेत कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असल्यास

तपासणी

– पुरुषांमध्ये स्पर्म आणि सेमेन तपासणी पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्यामागील करणे बहुतेक वेळा पुरुषांमध्ये वंध्यत्व येते तेव्हा फारसे बोलले जात नाही, जेव्हा एखाद्या महिलेला वंध्यत्वाची समस्या जाणवते तेव्हा एक महिला आपल्या आई बहिण व जवळच्या सखी या सर्वांसोबत चर्चा करते परंतु पुरुषांमध्ये असे अजिबात घडत नाही. सर्वसाधारणपणे 30% समस्या ही पुरुषांमध्ये पाहायला मिळते.

– पुरुषांमध्ये हार्मोनल समस्या, सेक्शुअल डीसफंक्शन – अंडाशयाला आलेली सूज – लहानपणी झालेले एखादे इन्फेक्शन तसेच आधी काही त्रास असेल तर

उपचार पद्धती

नैसर्गिक रित्या गर्भधारणा जर आवडत नसेल तर अशा वेळी प्रगतिशील व अद्ययावत उपचार पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे पण अशावेळी लवकर उपचार पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे अन्यथा वय वाढून गेल्याने अनेकदा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

– IUI उपचार पद्धती

– दुर्बिणी द्वारे शस्त्र क्रिया जसे की हिस्ट्रो स्कोपी ( hestroscopy) लॅप्रोस्कोपी (laproscopy)

– रूटीन आय व्ही एफ (routin IVF) वरील उपचार पद्धती वापरून जरी समस्या मिटत नसेल तर अश्या वेळी आधुनिक पद्धत वापरून प्रक्रिया केली जाते

Eggs c process

ICSI

Blastocyst culture

LAH

Cryopresevative

वरील काही अत्याधुनिक उपचार पद्धती वापरून वंध्यत्वाची समस्या दूर करता येऊ शकते.

टिप्स : या लेखामध्ये सांगितलेली माहितीतज्ज्ञ डॉक्टर यांच्या अनुभवावरून सांगण्यात आलेली आहे टीव्ही 9 तुम्हाला कोणतीही माहिती वापरण्याचा व त्याचा प्रत्यक्ष उपचार करण्याचा सल्ला देत नाही जर तुम्हाला वंध्यत्वाची समस्या व कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर अशा वेळी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

Nagpur Crime | नागपुरात तीन दिवसांपूर्वी घरफोडी केली; बारमध्ये नशेत बरडले नि कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?

असेही पशुप्रेम! कुत्रीसह दोन पिल्ले मध्यरात्री पडली विहिरीत; मलकापुरातील पशुप्रेमींनी रातोरात कसे काढले बाहेर?

Dam water| आनंदाची बातमी! राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.