गर्भधारणा होत नाही आहे? मग करा हे उपाय, लवकरच मिळणार गूडन्यूज
Health Tips आई होण्याचं स्वप्न प्रत्येक स्त्री बघत असते. पण अनियमित मासिक पाळी इतर काही कारणांमुळे महिलांना गर्भधारणेसाठी अडचण येत आहे. अशावेळी त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक महिलांना गर्भधारणा होत नाही म्हणून नैराशात जातात. मग आता असं नाराज न होता हा उपाय करुन बघा...तज्ज्ञ पण हा उपाय करण्याचा सल्ला देत आहेत.
घर आणि नोकरीचा ताप आणि त्यात अनियमित मासिक पाळी यामुळे अनेक महिलांना आजकाल गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम निर्माण होतोय. पण प्रत्येक गोष्टीसाठी उपाय असतो. आपल्या आहारात काही बदल केल्यास आपण गर्भधारणेची समस्या दूर होऊ शकते. सीड साइक्लिंग…हो, सीड साइक्लिंग हे केल्याने गर्भधारणेची शक्यता वाढवते. जर मी आई होण्यास उत्सुक आहात तर डॉक्टरांच्या सल्लानुसार तुम्ही सीड साइक्लिंग सुरु करु शकता.
काय आहे सीड साइक्लिंग यात मासिक पाळीच्या सहामाहीत म्हणजे ओव्हुलेशनच्या आधी काही बिया खायच्या आहे जेणे करुन यातून तुम्हाची नैसर्गिकरित्या इस्ट्रोजेनची पातळी वाढते. या बिया खाल्ल्यामुळे गर्भधारणेसाठी लागणारे इस्ट्रोजेन वाढते आणि वाईट इस्ट्रोजेनचा नाश होतो. गर्भधारणेसाठी निरोगी अंडाच्या वाढीत इस्ट्रोजेनची मुख्य भूमिका असते. यात नंतर तुम्हाला ओव्हुलेशन किंवा ल्युटियल फेजमध्ये निरोगी गर्भ स्थिर होण्यासाठी प्रोजेस्टेरॉन वाढविणाऱ्या बिया खायच्या असतात.
अनियमित मासिक पाळीसाठीही फायदेशीर हो, जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर यासाठीही तुम्ही या सीड साइक्सिंगचा उपाय करु शकता. यात तुम्ही मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून जवस आणि भोपळ्याच्या बिया साधारण 14 दिवस खा. मग 15 व्या दिवसापासून ते 28 व्या दिवसापर्यंत तीळ आणि सूर्यफूल याचा बिया खा.
ओव्यूनलेशनचा पहिले या बिया खा
nutritionj.biomedcentral.com वर प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार सीड साइक्लिं गवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या म्हण्यानुसार इस्ट्रोजेनसाठी जवस आणि भोपळ्याच्या बिया खाल्ल्या पाहिजे. तर अंबाडीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि ओमेगा – 3 फॅटी अॅसिड असतं. याचा फायदा अनियमित ओव्हुलेशन थांबविण्यात होतो आणि ल्यटियल फेज लांबवण्यास फायदा होतो. या प्रयोगासाठी महिलांचा दोन गट बनविण्यात आला. एक गटात पीसीओएस असलेल्या महिलांनावर हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात 12 आठवडे दररोज 30 ग्रॅम जवसाचे पावडर खायचं आहे. आणि सोबतच जीवनशैलीत काही बदल करण्यास सांगितले. तर काही महिलांना फक्त जीवनशैलीत काही बदल सांगण्यात आले होते.
प्रयोगातून हे झालं सिद्ध जवसाचे पावडर खाणाऱ्या महिलांमध्ये वजन कमी होणे, त्यांचे इन्सुलिन नॉर्मल होते आणि लेप्टिनची पातळीही सुधारली होती. या अभ्यासातून हे लक्षात आलं की जीवनशैलीत काही बदल केले आणि जवसाच्या बिया खाल्ल्यामुळे PCOS बरा होण्यास आणि गर्भधारणा होण्यास मदत होते. तर भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
ओव्यू्लेशननंतर या बिया खा ओव्यूलेशननंतर तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया खाव्यात. या दोन्ही बियांमुळे प्रोजेस्टेरॉन वाढवण्यासाठी मदत होते. तर तिळाच्या बियांमध्ये असलेल्या कॅल्शियम, ओमेगा 6 फॅटी असिडमुळे प्रजनन क्षमता वाढविणारी जीवनसत्त्वे असतात. आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 चं प्रमाण जास्त आहे.
हे नक्की करा, होणार फायदा सीड साईक्लिंगचा फायदा करण्यासाठी या उपायाच्या वेळी तुमच्या मेंदूला सिग्नल द्या. की या बिया खाल्ल्यामुळे माझ्या शरीरात इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढत आहे. तर ओव्हुलेशननंतर खाण्यात येणाऱ्या बियांमुळे माझ्या शरीरात प्रोजेस्टेरॉन तयार होतं आहे. या प्रयोग करता महिलेने सकारात्मक राहणं गरजेचं आहे. या प्रयोगाचा आपलाला फायदा होईल आणि आपण आई होऊ शकू असं सतत मेंदूला सांगत राहा.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा News Keywords