6-6-6 वॉकींग रूल, वजन कमी करणे, फिट राहण्याचा सर्वात सोपा अन् फायदेशीर फंडा
6-6-6-Walking Rule: सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. त्यामुळे कोणतीही घाईगडबड न करता तुमचे वॉकचे काम पूर्ण होईल. संध्याकाळी काम संपल्यावर जेवणापूर्वी चालण्याच्या सवयीचा तुमच्या दिनचार्यात समावेश करा. चालताना वातावरणानुसार साधे कपडे वापरा.
6-6-6-Walking Rule: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक जण नियमित व्यायम करतात. काही जण जिममध्ये जावून घाम गाळतात. परंतु प्रत्येकाला ते शक्य नसते. यामुळे चालणे हा सर्वात प्रभावी व्यायम आहे. चालण्याचा ‘6-6-6 वॉकिंग रूल’ वेगाने लोकप्रिय होत आहे. या नियमात सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता 60 मिनिटांची वॉक केली जाते. त्यात सहा मिनिटांचा वार्म-अप, 6 मिनिटे कूल-डाउनचा समावेश आहे. या नियमामुळे तुमचे आरोग्यच चांगले राहणार नाही तर दीर्घ कालावधीपर्यंत तुम्हाला फायदाही होणार आहे.
सकाळी सहा वाजता ताजी हवा आणि शांत वातावरण असते. त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्हाला उर्जा मिळते. संध्याकाळी सहा वाजता केलेला वॉक कामाचा तणाव कमी करतो. त्यामुळे शरीराला आराम मिळते. तसेच सहा मिनिटांचा वार्म-अप आणि कूल-डाउन शरीराला दुखापतीपासून वाचवतो. त्यामुळे सध्या 6-6-6 हा फंडा यशस्वी होत आहे. सोशल मीडियावर या फंड्याची चर्चा रंगली आहे.
वार्म-अप आणि कूल-डाउनचे फायदे
सहा मिनिटांचा वार्मअपने तुमचे स्नायू सक्रीय होतात. तसेच ह्रदयाचे ठोके हळूहळू वाढतात. त्यामुळे या सहा मिनिटांत हळूहळू चालण्याचा सल्ला दिला जातो. कूल डाऊनमुळे ह्रदयाचे ठोके सामान्य होतात. तसेच स्नायूवरील ताण कमी होतो. यामुळे हळूहळू चालणे आणि दीर्घ श्वास घेण्यासोबत स्ट्रेचिंग करण्याचा समावेश आहे.
6-6-6 वॉकीग रूलचा आरोग्यास होणारा फायदा
- नियमित चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ह्रदयाचा आजार होण्याचा धोका कमी होतो.
- कॅलरीचा परिपूर्ण उपयोग होतो. तसेच वजन नियंत्रणात राहतो.
- संध्याकाळच्या वॉकमुळे तणाव कमी होतो. मानसिक आरोग्य चांगले होते.
- दिवसभरातील शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो. झोप चांगली येत.
सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. त्यामुळे कोणतीही घाईगडबड न करता तुमचे वॉकचे काम पूर्ण होईल. संध्याकाळी काम संपल्यावर जेवणापूर्वी चालण्याच्या सवयीचा तुमच्या दिनचार्यात समावेश करा. चालताना वातावरणानुसार साधे कपडे वापरा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.