Early Puberty Signs : वेळेपूर्वीच वयात येतोय तुमचा मुलगा ? ही लक्षणे दिसताच व्हा सावध !

वयात येताना मुलगा आणि मुलींच्या शरीरात वेगवेगळे बदल दिसू लागतात. या कालावधीदरम्यान मुलींना मासिकपाळी सुरू होते आणि स्तनांचा आकार वाढू लागतो. तर मुलांमध्ये टेस्टिकल्स आणि पेनीसचा आकार वाढणे, तसेच चेहऱ्यावर केस उगवणे, आवाज बदलणे, असे बदल दिसू लागतात.

Early Puberty Signs : वेळेपूर्वीच वयात येतोय तुमचा मुलगा ? ही लक्षणे दिसताच व्हा सावध !
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 7:04 PM

मुंबई :  आजकाल बऱ्याच पालकांना ही चिंता असते की त्यांचा मुलगा अथवा मुलगी वेळेपूर्वीच वयात येत आहेत किंवा तरूण होत आहेत. याला अर्ली प्युबर्टी (Early Puberty) असे म्हटले जाते. वयात येताना कोणताही मुलगा अथवा मुलीच्या शरीरात वेगवेगळे बदल दिसू लागतात. साधारणत: मुलींमध्ये (Girls) 8 ते 13 वर्षांदरम्यान वयात येण्याची प्रक्रिया सुरू होते, तर मुलांमध्ये (Boys) ही वेळ 9 ते 14 वर्षांपर्यंत असते. मात्र बऱ्याच वेळा काही मुले अथवा मुली यापूर्वीच वयात येऊ लागतात. त्याला प्रीकॉशिअस प्यूबर्टी अथवा अर्ली प्यूबर्टी म्हटले जाते. वेळेपूर्वीच अथवा लवकर वयात येण्यामागचे नेमके कारण काय हे समजणे तसे कठीण आहे. ज्या मुली अथवा मुलांमध्ये 8 किंवा 9 वर्षापूर्वीच वयात येण्याची प्रक्रिया सुरू होते, त्यालाच अर्ली प्युबर्टी म्हटले जाते.

लवकर वयात येण्याची लक्षणे (Early Puberty Symptoms) –

साधारणत: नॉर्मल प्युबर्टी (Normal Puberty)आणि अर्ली प्युबर्टी (Early Puberty) यांची लक्षणे एकसारखीच असतात मात्र, ती सुरू होण्याचा कालावधी वेगळा असतो. मुलगा आणि मुलगी वयात येतानाची लक्षणे काही वेगळी असतात.

मुली वयात येताना (Puberty Symptoms in Girls) त्यांच्या शरीरात वेगवेगळे बदल दिसू लागतात. या कालावधी दरम्यान मुलींना मासिकपाळी सुरू होते आणि स्तनांचा आकार वाढू लागतो. तर मुलांमध्ये टेस्टिकल्स आणि पेनीसचा आकार वाढणे, तसेच चेहऱ्यावर केस उगवणे, आवाज घोगरा होणे, असे बदल (Puberty Symptoms in Boys)दिसू लागतात.

मुली आणि मुलं यांची वेळेपूर्वीच वयात येण्याची (Early Puberty)लक्षणं एकसारखीच असतात. खाजगी जागांवर केस येणे, मुरुमे, पिंपल्स, शरीरातीन एक विशिष्ट असा दुर्गंध येणे, अशी काही लक्षणे दिसू शकतात.

वेळेपूर्वीच वयात येण्याचे कारण (Early Puberty Causes)-

बऱ्याच वेळेस मुलगा अथवा मुलगी वेळेपूर्वीच वयात येण्याचे नेमके कारण शोधणे कठीण होऊ शकते. काही वेळेस एखाद्या आजारामुळेही मुलगा अथवा मुलगी वेळेपूर्वीच वयात येऊ शकते.

Early Puberty Risk Factors –

जेंडर – मुलांच्या तुलनेत मुली वेळेपूर्वी वयात येण्याची शक्यता 10 टक्के जास्त असते.

जेनेटिक्स – सेक्स हार्मोनच्या रिलीजला ट्रिगर करणारे जेनेटिक म्यूटेशन कधी कधी अर्ली प्यूबर्टीचं कारण होऊ शकते. साधारणपणे या मुलांच्या आई-वडील किंवा भाऊ-बहिणीत अशा प्रकारचा जेनेटिकची समस्या असते.

जाडेपणा – अनेक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की मुली वेळेपूर्वी वयात येण्यामागचे एक कारण हे जाडेपणा हे असतं. मात्र मुलांच्या बाबतीत हे घडताना दिसत नाही. तसेच संशोधकांच्या मते गोऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अफ्रीकी अमेरिकन मुलींमध्ये वयात येण्याची प्रक्रिया 1 वर्ष आधीच सुरू होते.

अर्ली प्युबर्टीवरील उपाय –

यासंदर्भात तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यास ते तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. मुलांची मेडिकल हिस्ट्री जाणून घेतात. त्यांची शारीरिक तपासणीही केली जाऊ शकते. मुलांच्या हार्मानेची पातळी तपासण्यासाठी ब्लड टेस्टही केली जाऊ शकते.

अर्ली प्युबर्टीमुळे होऊ शकणारा त्रास (Early Puberty Complications) –

वयात येण्याची प्रक्रिया वेळेपूर्वीच सुरू झाल्यामुळे मुलांना काही शारिरीक तसेच मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

कमी उंची – वेळेपूर्वी वयात येण्याच्या प्रक्रियमुळे मुलांची वाढ खुंटते. त्यामुळे मुलांची उंची वाढणे थांबू शकते. कमी उंचीच्या समस्येचा सामना त्यांना करावा लागू शकतो.

वागण्या- बोलण्यात होणारा त्रास – अर्ली प्युबर्टी आणि मुलांच्या वागण्यात होणारे बदल यात परस्पर संबंध असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. या कालवधीदरम्यान हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे मुलं चिडचिडी होऊ शकतात.

शारीरिक संबंध – जी मुलं वेळेपूर्वीच वयात येतात, ते कमी वयातच सेक्शुअली ॲक्टिव्ह होऊ शकतात. पालकांसाठी ही बाब अतिशय चिंतेची ठरू शकते.

स्ट्रेस – वेळेपूर्वी वयात येण्याची ही प्रक्रिया काही मुलांमध्ये तणाव निर्माण करू शकते. त्यांना आपल्या वयाच्या इतर मुलांसोबत वावरताना ताण येऊ शकतो. या काळात मासिक पाळी लवकर सुरू झाल्यामुळे अनेक मुलींना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे अशा वेळी पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी मुलांशी या विषयावर बोलून यावेळी शरीरात होणारे बदल हे नॉर्मल असल्याचे सांगत आश्वस्त करावे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.