Power Nap Benefits : रात्रीच्या झोपेइतकीच फायदेशीर असते का Power Nap ? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

पॉवर नॅप म्हणजे नक्की काय ? आजकाल ही कन्सेप्ट एवढी लोकप्रिय का होत आहे, त्याचे फायदे काय होतात ? सविस्तर माहिती जाणू घेऊया.

Power Nap Benefits : रात्रीच्या झोपेइतकीच फायदेशीर असते का Power Nap ? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 3:13 PM

नवी दिल्ली : दिवसभर निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी चांगली व शांत झोप (sleep) घेणे खूप आवश्यक असते. कारण आपल्या दैनंदिन कामात प्रॉडक्टिव्हिटी आणण्याचे कार्य केवळ ‘चांगली झोप’ करते. रात्री झोप नीट झाली नाही तर दिवसा आपण थकलेले (tired) राहतो व त्याचा अनेक कामांवर परिणाम होऊ शकतो. असे म्हटले जाते की प्रत्येक प्रौढ व्यक्तीने किमान 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. पण व्यस्त वेळापत्रक आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा हे शक्य होत नाही. त्यामुळे बरेच लोक दिवसा ‘पॉवर नॅप’ (Power Nap) घेणे पसंत करतात.

‘पॉवर नॅप’ची ही संकल्पना आजकाल खूप लोकप्रिय झाली आहे. कारण रात्री 8 तासांची झोप न मिळाल्याने शरीरावर होणारे परिणाम या पॉवर नॅपमुळे कमी होतात, असं काही लोक मानतात. खरंतर दिवसा काढलेल्या 15-20 मिनिटांच्या डुलकीला पॉवर नॅप म्हणतात. पण ही पॉवर नॅप खरोखरच झोपेची कमतरता भरून काढू शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो. दिवसभरात वेळोवेळी पॉवर नॅप्स घेण्याचे अनेक फायदे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

हे सुद्धा वाचा

पॉवर नॅपची योग्य वेळ कोणती ?

तज्ञांच्या मते, छोटीशी डुलकी घेण्यासाठी कोणती अशी ठराविक वेळ नसते. ते त्या व्यक्तीवर आणि तिच्या गरजेवर अवलंबून असते. जर तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम करत असाल तर डुलकी घेण्याची योग्य वेळ ही दुपारच्या जेवणानंतर, म्हणजे दुपारी 12.30 ते 2 या दरम्यान असू शकते. पण दुपारी 4 नंतर डुलकी काढणं ही योग्य सवय नाही. कारण याचा परिणाम तुमच्या रात्रीच्या झोपेवर होऊ शकतो.

पॉवर नॅप्सचा कालावधी मर्यादित करण्यामागचे वैज्ञानिक कारण हे स्लीप इनर्टिया ट्रस्टेड सोर्स नावाच्या गोष्टीवर अवलंबून आहे. सोप्या भाषेत सांगायचे झासले तर तेव्हा आपल्याला सुस्ती आल्यासारखे वाटते. सुस्तीमुळे आपले डोके जड होते आणि आपल्याला थकवा जाणवतो. सहसा असे घडते जेव्हा आपण दीर्घ झोपेनंतर जागे होतो. त्यामुळे आपल्या दिवसभराच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम होतो.

जर एखाद्या व्यक्तीला सतत चांगली व शांत झोप येत नसेल आणि ती फक्त पॉवर नॅप घेऊन काम करत असेल, तर ती व्यक्ती शांत झोप व पॉवर नॅप दोन्ही न घेता काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे, असे म्हणावे लागेल. कारण पॉवर नॅपमुळे झोपेची कमतरता बर्‍याच प्रमाणात भरून निघू शकते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.