दही खाण्याची योग्य पद्धत कोणती? कधी अन् किती दही खाणे आरोग्यदायी
Benefits of Curd: दही खाण्याची योग्य वेळ कोणती? हा प्रश्न महत्वाचा आहे. दही खाण्याची योग्य वेळ सकाळचा नाश्ता मानली जाते. यामुळे नियमित नाश्त्यात दहीचा समावेश तुम्ही करू शकता. दही खाल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. दुपारच्या जेवणाच्या वेळी, दही, रायता किंवा ताक देखील जेवणासोबत घेता येते.

Benefits of Curd: उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु दही योग्य पद्धतीने खाणे महत्वाचे आहे. आयुर्वेदात दही खाण्याबाबत काही नियमही सांगितले आहेत. म्हणूनच दही कसे खावे? याबद्दल अनेक लोक गोंधळलेले असतात. दही योग्य पद्धतीने सेवन केल्यास त्याचे दुहेरी फायदे मिळू शकतात. पण जर तुम्ही दही खाताना काही चुका केल्या तर ते नुकसान देखील करू शकते.
दही खाण्याची योग्य वेळ कोणती?
दही खाण्याची योग्य वेळ कोणती? हा प्रश्न महत्वाचा आहे. दही खाण्याची योग्य वेळ सकाळचा नाश्ता मानली जाते. यामुळे नियमित नाश्त्यात दहीचा समावेश तुम्ही करू शकता. दही खाल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. दुपारच्या जेवणाच्या वेळी, दही, रायता किंवा ताक देखील जेवणासोबत घेता येते. हे तुम्हाला अन्न पचवण्यास देखील मदत करते. आयुर्वेदानुसार रात्री दही खाणे टाळावे. रात्री ते खाल्ल्याने पित्त आणि कफ विकारांची समस्या वाढू शकते.
दही कसे खावे?
दह्यात कोणतीही गोष्ट न मिसळता खाणे चांगले मानले जाते. जर तुम्ही साधे दही खाऊ शकत नसाल आणि तुम्हाला गोड दही खायला आवडत असेल तर थोडे मध, साखर किंवा गूळ त्यात मिसळू शकता. जर तुम्हाला खारट दही आवडत असेल तर हलके खारट दही खा. यासाठी तुम्ही दह्यात सेंधा मीठ किंवा काळे मीठ टाकू शकता. काही लोक तुपासोबत दही खातात, त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. दही फळ, भाज्यासोबत खाल्यास ते अधिक चांगले असते.




हे सर्व लक्षात ठेवा
- नेहमी ताज्या दह्याचे सेवन करा. जुने दही नुकसान करणारे असते.
- एका दिवसात एक वाटीपेक्षा जास्त दही खाऊ नका. जास्त दही खाणे आरोग्यासाठी नुकसान करणारे आहे.
- दह्याचे स्वरुप उष्ण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दही कमी प्रमाणात सेवन करा.
- सर्दी, खोकला असताना दही खाऊ नका.
- दह्यात असणारे गुड बॅक्टरिया मीठ नष्ट करते. त्यामुळे दह्यात जास्त मीठ टाकू नका.
- दही आणि दूध सोबत खाऊ नका.