डोळे फडफडणं शुभ की अशुभ, काय म्हणतं विज्ञान ? जाणून घ्या नेमकं कारण
Health Tips डोळे फडफडतात आहे, असं आपण ऐकतो...मग अग तुझा उजवा डोळा फडफडतो आहे की डावा...त्यावर स्त्री आणि पुरुष यांना कुठला डोळा फडफडला की शुभ असतो ते सांगितलं जात. पुरुषांचा उजवा आणि स्त्रीचा डावा डोळा फडफडला की चांगली बातमी येणार असं म्हणतात. अहो पण विज्ञान काही दुसरंच कारण सांगते. डोळे फडफडणे म्हणजे पापणी फडफडण्याचा संबंध आपल्या आरोग्याशी आहे.
मुंबई : डोळे फडफडणं हे खूप सामान्य लक्षण आहे. डोळा (Eyes) हा सेकंद किंवा 1 ते 2 मिनिटांपर्यंत फडफडत असतो. यामागे शुभ, अशुभ अशी कारणे जोडली जातात. मात्र डोळे फडफडण्यामागे इतर अनेक कारणं असतात. पापण्या फडफडणे म्हणजे डोळा फडफडणे हा आरोग्याशी संबंध आहेत. जर डोळे साधारण एक दिवस किंवा महिनाभर फडफडत असेल तर डॉक्टरांच्या (Doctor) भाषेत तुम्हाला मायक्योमियाचा त्रास होतोय. खरं तर डोळ्यांच्या पापण्यांमधील स्नायूंचं आकुंचन पावल्यामुळे तुमच्या पापण्या फडफडतात. याव्यतिरिक्त डोळा फडफण्यामागे अजून काय काय कारणं असू शकतात ते जाणून घेऊया
काय कारणं आहेत डोळे फडफडण्यामागे
1. ताणतणाव – बदलेल्या जीवनशैलीमुळे स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी आज सगळ्यांची धडपड सुरु असते. त्यामुळे आपण अनेक वेळा ताणतणावात असतो आणि याचा परिणाम आपल्या शरीरासोबतच आपल्या डोळ्यांवर होतो. म्हणून अशावेळी तुमचा डोळा फडफडतो.
2. अपुरी झोप – पुरेसा आराम न झाल्याने अपुरी झोप झाल्यामुळे आपल्या शरीरात थकवा जाणतो. आणि अशातून आपल्या पापण्या फडफडतात.
3. डोळ्यांवर ताण – आजकाल अनेकांचं वेळ जास्त जास्त लॅपटॉप, कंम्यूटर आणि स्मार्ट फोनवर जात असतो. अनेक वेळा आपण टीव्हीसमोर तासंतास बसलेलो असतो. याचा ताण डोळ्यांवर पडतो.
4. एलर्जी – जर तुम्हाच्या डोळाला काही इजा झाली असेल त्यातून एलर्जी झाल्यास तरीही डोळा फडफडतो.
5. चष्मांचा नंबरवर ठेवा लक्ष – हो, जर तुम्हाला चष्मा असेल आणि तुम्ही जर नंबरची काळजी व्यवस्थित घेतली नाही. तर डोळ्यांवरील ताण वाढेल आणि त्यामुळेही तुमचा डोळा फडफडतो.
6. कॅफेन – म्हणजे कॉफी, चहा, चॉकलेट आणि सॉफ्ट ड्रिंक्स या पेयांचं अतीसेवन केल्यामुळेही डोळा फडफडण्याचा त्रास होतो.
7. डोळे कोरडे होणे – साधारण वयाच्या 50 नंतर डोळे कोरडे व्हायला लागता. डोळ्याच्या आरोग्यासाठी डोळे काय ओलसर असावे. मात्र वाढत्या लॅपटॉप, कंम्यूटर आणि स्मार्ट फोनच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांना कोरडेपणा जाणवायला लागतो. त्यामुळे पण पापण्या फडफडतात.
8. अकोल्होल – हो, अकोल्होलचं सेवन रोज केल्यास तुम्हाला डोळे फडफडण्याची समस्या होऊ शकते.
9. मॅग्नेशियमची कमी – आहारातून जर योग्य प्रमाणात मॅग्नेशियम मिळालं नाही तर डोळे फडफडण्याचा त्रास होऊ शकतो.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा
इतर बातम्या :
Pandit Ji Rocks Dulha Shock : लग्नमंडपात वराला नव्हता धीर; मग पुजारी असं काही बोलले, की…
Share Market | शेअर्स बाजारात घसरणीचे सत्र कायम; सेन्सेंक्स 634, निफ्टी 181 अंकांनी गडगडला