सांधेदुखीचा आणि संधीवाताचा एकमेकांशी काय संबंध? तुमची हाडं वाजत असतील, तर हे वाचाच!

बदललेल्या वातावरणामुळे तसेच थंडीमुळे अनेकदा कंबर दुखी, सांधे दुखी, हाता पायांना ठणका बसू लागतात परंतु अश्या वेळी आपण दुर्लक्ष केले तर या समस्याचे रूपांतर संधीवातामध्ये होऊ शकते म्हणून या बद्दल अधिक जाणून घेणे गरजेचे आहे.

सांधेदुखीचा आणि संधीवाताचा एकमेकांशी काय संबंध? तुमची हाडं वाजत असतील, तर हे वाचाच!
arthritis
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:43 AM

मुंबई :  सध्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही एक समस्या प्रामुख्याने पाहायला मिळते आहे ती समस्या म्हणजे सांधेदुखीची समस्या (arthritis). बहुतेक वेळा ही समस्या वय वर्ष 40 नंतर सुरु होत असते परंतु हल्ली बदललेली आहार पद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे प्रत्येक जण कामांमध्ये व्यस्त असतो. कामामध्ये व्यस्त असल्याने बहुतेक वेळा आपण कधीही कोणत्याही प्रकारचा आहार सेवन करतो आणि अनेक वेळा आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्व सुद्धा प्राप्त होत नाही आणि म्हणूनच शरीरामध्ये अनेकदा कॅल्शियमची कमतरता निर्माण होते परंतु ही कॅल्शियमची ( calciam effeciency) कमतरता भविष्यात धोक्याची घंटा तर ठरणार नाही ना याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे म्हणूनच अशा वेळी शरीरातील विटामिन, मिनरल्स आणि आवश्यक ते पोषक घटकांची नियमितपणे तपासणी करायला हवी. पोषक तत्व कमी झाल्याने मान दुखी, गुडघे दुखी ,कंबर दुखी यासारख्या वेदना त्रास देतात ह्या समस्या प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगळे कारण सुद्धा तितकेच कारणीभूत ठरतात.या समस्या बद्दल अनेकांच्या मनात शंका असतात म्हणूनच या समस्या बद्दल टिव्ही 9 शी बातचीत करताना डॉक्टर डॉ. सत्यन गुजर यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकर्षाने प्रकाश टाकला. डॉ. सत्यन गुजर गेल्या 19 वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत असेच डॉक्टरांनी आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic treatment) यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना बरे सुद्धा केलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया संधिवात या आजाराबद्दल..

संधिवात म्हणजे नेमके काय?

ज्यावेळी व्यक्तीच्या शरीरामध्ये वात निर्माण होऊ लागतो. वातामुळे बहुतेक वेळा आपल्या शरीरातील हाडांची कालांतराने झीज होऊ लागते. हाडांची झीज झाल्याने व्यक्तीला कोणत्याही शारीरिक क्रिया करताना त्रास होऊ लागतो आणि हळूहळू शरीरातील वंगण कमी होऊ लागते आणि त्यांच्या संदर्भातील समस्या जाणवू लागतात.

सांधेदुखीचा आणि संधीवाताचा काय असतो एकमेकांशी संबंध

तसे पाहायला गेले तर मानवी शरीरामध्ये आपल्याला प्रामुख्याने तीन समस्या पाहायला मिळतात ते म्हणजे कफ,पित्त आणि वात.जेव्हा आपण सांधेदुखी आणि संधीवात बद्दल चर्चा करतो तेव्हा या समस्या वाताशी संबधित आहे. आपल्या शरीरात वात म्हणजेच गॅस निर्माण होतो यामुळे आपल्या शरीरातील जी हाडे असतात त्याची झीज होऊन अनेकदा त्यांच्यातील जे तेल असते त्याला सोप्या भाषेत वंगण असे म्हणतो.हे वंगण जर संपले तर आपल्या सांध्याची कार्यावर विपरीत परिणाम होतो आणि रुग्णाला अनेक शारीरिक क्रिया करायला जमत नाही. अशा वेळी मान दुखी, कंबर दुखी, नसांवर होणारा परिणाम, उठताना – बसताना त्रास होणे यासारख्या समस्या डोके वर काढतात. जेव्हा आपल्या शरीरातील सांध्यांची गती कमी होते अशावेळी संधिवात हा आजार उद्भवतो आणि म्हणूनच या दोन्ही समस्या एकमेकांशी संबंधित आहेत.

सांधेदुखीची कारणे

– सांध्यांमध्ये होणारा बदल – इतर आजारांमुळे होणारी सांधेदुखी -अपचनाचा त्रास यामुळे शरीरात विषारी घटक निर्माण होणे – जुनाट ताप (अनेक वर्षापासून असलेला ताप)

संधीवाताची लक्षणे

– हाडांची झीज होणे – उठता बसताना वेदना होणे – हाडांवरून टकटक आवाज येणे – कोणती शारीरिक क्रिया करताना त्रास होणे – सपोर्ट दिल्याशिवाय चालायला न जमणे

टिप्स : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामधील असून तज्ञ मंडळींची मते सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम हवाय?, मग ‘या’ पदार्थांचे सेवन आवश्य करा

आजार अनेक उपाय एक! जिऱ्याचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?

झोपण्यापूर्वी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, शरीराला होईल मोठे नुकसान…

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.