हिवाळ्यात दूध पिण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या तज्ञांकडून
दुधामध्ये कॅल्शियम,प्रोटीन आणि हेल्दी फॅट यासारखे आवश्यक घटक असतात. हे पिल्याने कमकुवत हाडांना जीवनदान मिळते, स्नायू मजबूत होतात आणि शरीर सक्रिय राहते. पण दूध पिण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया तज्ञांकडून.
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच दूध हे फायदेशीर आहे. अनेक वेळा डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यामध्ये दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे शरीराला उष्णता तर मिळतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत होते. दुधाला पूर्ण अन्न असेही म्हणतात. दुधामध्ये व्हिटॅमिन ए, बी12, डी, कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॅट यासारखे पोषक घटक असतात. श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहार तज्ञ प्रिया पालीवाल यांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात शरीर ऊबदार ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. आणि ही गरज पूर्ण करण्यास दूध मदत करते. पण तुम्हाला हिवाळ्यात दूध पिण्याची योग्य पद्धत माहिती असणे आवश्यक आहे. तरच त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला होईल.
दूध पिण्याचे फायदे
रोज दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. यासोबतच ते त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. दुधामध्ये व्हिटॅमिन B 12 असते. जे केसांना निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्या सोबतच पचनासाठी ही फायदेशीर आहे.
दूध पिण्याची योग्य पद्धत
प्रिया पालीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे थंडीच्या काळात थंड दूध पिऊ नये हे लक्षात ठेवा. हिवाळ्यात कोमट दूध पिल्यास केवळ थंडीपासून बचाव होणार नाही तर पचनक्रिया देखील सुधारेल. हिवाळ्यात एका ग्लास मध्ये चिमूटभर हळद किंवा थोडं मध घालून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
नीट गाळून घ्या
हिवाळ्यात दूध पिण्यापूर्वी ते नीट गाळून घ्या आणि थोडा वेळ उकळून घ्या. यामुळे दुधातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात. ज्यामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. लोकांना दूध पिण्यास समस्या येऊ शकतात. बऱ्याच लोकांना दूध पिल्यावर ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो तर काही लोकांना लैक्टोज असहिष्णुता असू शकते. ज्यामुळे पोट खराब होऊ शकते मात्र अशी कोणतीही समस्या उद्भवली असेल तर आरोग्य तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.