VItamin P काय आहे? कमतरता कशी भरून काढावी? काय खावं? वाचा
Vitamin P एक प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स म्हणून ओळखले जाते. त्याच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे आजार आपल्या शरीरात घर करू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून आपण त्याची कमतरता भरून काढू शकता.
मुंबई: निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात. संतुलित आहाराने व्हिटॅमिनची कमतरता भरून काढता येते. जर शरीरात कोणत्याही व्हिटॅमिनची कमतरता असेल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी बद्दल आपण ऐकले असेल, परंतु आपण ‘Vitamin P’ बद्दल ऐकले आहे का आणि या व्हिटॅमिनच्या कमतरतेच्या समस्या काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत? या व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.
Vitamin P एक प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स म्हणून ओळखले जाते. त्याच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे आजार आपल्या शरीरात घर करू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून आपण त्याची कमतरता भरून काढू शकता.
आंबट फळे
‘Vitamin P’ ची कमतरता भरून काढण्यासाठी लआंबट फळे खा. संत्री, द्राक्षे आणि लिंबू यांसारख्या फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स खूप चांगल्या प्रमाणात आढळतात.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन पी असते. ग्रीन टीचे वजन कमी करण्यापासून बरेच फायदे आहेत म्हणून व्हिटॅमिन पी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश करा
भाज्या
पालक, ब्रोकोली सारख्या भाज्यांमध्येही व्हिटॅमिन पी भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर दैनंदिन आहारात या भाज्यांचा समावेश केल्याने इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
बेरी
Vitamin P ची कमतरता भरून काढायची असेल तर ब्लूबेरी, रास्पबेरी, ब्लॅक बेरी आणि स्ट्रॉबेरी इत्यादी आपल्या आहारात असावं. याशिवाय सफरचंद हा देखील एक उत्तम पर्याय आहे.
डार्क चॉकलेट
चॉकलेट अनेकांना आवडतं, पण प्रत्येकजण डार्क चॉकलेट खात नाही. डार्क चॉकलेट हा देखील व्हिटॅमिन पी साठी उत्तम पर्याय आहे.