AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी ? जाणून घ्या हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपाय

तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून कोलेस्ट्रॉल मॅनेज करू शकता. वयानुसार कोलेस्ट्रॉलची किती पातळी असावी हे जाणून घेऊया.

वयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी ? जाणून घ्या हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपाय
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 12:38 PM

नवी दिल्ली – हाय कोलेस्ट्रॉलमुळे (High Cholesterol) हृदयविकार आणि हार्ट ॲटॅकची जोखीम वाढू शकते. औषधांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होऊ शकते पण तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केलेत तर कोलेस्ट्रॉल मॅनेज करू शकता. तुमची लाईफस्टाइल आणि आहारात (change in lifestyle and diet) बदल करून कोलेस्ट्रॉल बऱ्याचशा प्रमाणात नियंत्रित करू शकता. कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे याचे उपाय (Ways To Reduce Cholesterol) बऱ्याच जणांना माहीत नसतात. हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया.

1) व्यायाम करा

शारीरिक हालचालींमुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि तुमचे एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होऊ शकते. आठवड्यातून किमान 5 वेळा सायकल चालवणे, जॉगिंग करणे, पोहणे आणि नृत्य यासारख्या व्यायाम केला पाहिजे. त्यासाठी दिवसभरात अर्धा ते एक तास वेळ काढावा.

हे सुद्धा वाचा

2) फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा

आपल्या आहारात अधिक फायबरचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. क्विनोआ, चणे, शेव, राजमा, बदाम, ब्रोकोली इत्यादी पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होऊ शकते.

3) हेल्दी फॅट्स

ऑलिव्ह ऑईल, ॲवोकॅडो, काजू, बदाम आणि अक्रोड सारखे काही काजू यांसारखे पदार्थ खाऊ शकता. हे सर्व हेल्दी फॅट्,स आहेत, ज्यामुळे आपले LDL (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणार नाही. पण यासोबतच चीज, फुल क्रीम मिल्क आणि हाय फॅट रेड मीट खाण्याचे प्रमाण कमी करावे.

4) अतिरिक्त साखर अथवा मीठाचे सेवन टाळावे

अतिरिक्त सोडिअम आणि अतिरिक्त साखर या दोन्हींचे प्रमाण मर्यादेत ठेवा आणि हृदयासाठी हेल्दी पदार्थ खाण्यावर भर द्यावा. फळं, भाज्या, पूर्ण धान्य, मासे, चिकन, अंडी आणि ड्रायफ्रुट्स यांचे सेवन करावे.

5) धूम्रपान करू नये

धूम्रपान केल्यामुळे एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते. धूम्रपान करणे बंद केल्यास तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य रितीने मॅनेज करण्यास मदत होऊ शकते. खूप जास्त मद्यपान केल्याने ब्लड फ्लोमध्ये ट्रायग्लिसराइड फॅटचा स्तर वाढू शकतो आणि हाय ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत ठरू शकते.

वयानुसार कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level By Age)

19 वर्षे वा त्यापेक्षा अधिक वय 

एकूण कोलेस्‍ट्रॉल- 170 – 200 mg/dl

नॉन एचडीएल- 130 mg/dl पेक्षा कमी

एलडीएल- 100 mg/dl पेक्षा कमी

एचडीएल- 45 mg/dl पेक्षा अधिक

20 वर्षे किंवा त्या पेक्षा अधिक वयाच्या महिला

एकूण कोलेस्‍ट्रॉल- 125 – 200 mg/dl

नॉन एचडीएल- 130 mg/dl पेक्षा कमी

एलडीएल- 100 mg/dl पेक्षा कमी

एचडीएल- 50 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक

20 वर्ष अथवा त्याहून अधिक वयाचे पुरूष

एकूण कोलेस्ट्रॉल- 125 – 200 mg/dl

नॉन एचडीएल- 130 mg/dl पेक्षा कमी

एलडीएल- 100 mg/dl पेक्षा कमी

एचडीएल- 40 mg/dl अथवा त्याहून अधिक

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.