Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…
आधीच कोरोनामुळे जगभरातील लोक अस्वस्थ झाले आहेत. यातच आता ‘बर्ड फ्लू’ची बातमी देखील लोकांच्या भीतीचे कारण बनली आहे.
मुंबई : आधीच कोरोनामुळे जगभरातील लोक अस्वस्थ झाले आहेत. यातच आता ‘बर्ड फ्लू’ची बातमी देखील लोकांच्या भीतीचे कारण बनली आहे. भारताच्या अनेक राज्यांत ‘बर्ड फ्लू’ची पुष्टी झाली आहे. ज्यामुळे तिथल्या सरकारने पोल्ट्री उत्पादनांवर काही निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत अंडी किंवा कोंबडीचे मांस खाणे योग्य आहे का?, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उद्भवत आहेत. या संदर्भात रिसर्च काय म्हणतेय ते जाणून घेऊया…(What study says about the Risk of bird flu from eating chicken and eggs)
‘या’ राज्यांमध्ये बर्ड फ्लूची परिस्थिती
सध्या पोल्ट्री उत्पादनांवर बंदी असल्याने त्याच्या पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला ‘बर्ड फ्लू’ झाला नाही, असा दावाही सरकारने केला आहे. परंतु, ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूची खात्री झाली आहे, तेथील सरकार अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. या राज्यांमध्ये राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे. काही अहवालानुसार केरळमध्ये सुमारे 12,000 बदकांचा मृत्यू झाला आहे. तर, हिमाचलमध्येही सुमारे दोन हजार स्थलांतरित पक्षी मरण पावले. राजस्थानच्या विविध जिल्ह्यात 250पेक्षा जास्त कावळ्यांचा जीव गेला. हरियाणाच्या पंचकुला येथे जवळपास चार लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्येही बर्ड फ्लूने दरवाजा ठोठावला आहे. तर, केरळमध्ये बर्ड फ्लूला ‘राज्य आपत्ती’ घोषित करण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये या संदर्भात इशारे देण्यात आले आहेत.
पोल्ट्री उत्पादनांवर बर्ड फ्लूचा प्रभाव
अंडी आणि कोंबडीची विक्री करणारे पोल्ट्री उत्पादकांचा पूर्णपणे ठप्प होताना दिसत आहे. ‘बर्ड फ्लू’मुळे बर्याच राज्यांत प्रशासनाने पोल्ट्री उत्पादनांवर बंदी घातली आहे. ज्यामध्ये केरळ ते म्हैसूर दरम्यान सर्व पोल्ट्रीसंबंधित वाहतुक आणि मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये काही दिवसांपासून कोंबडी-अंडी विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. याशिवाय बर्याच राज्यात प्रशासनाने असे निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे या व्यवसायाशी संबंधित व्यापारी खूप नाराज झाले आहेत. आधीच कोरोनामुळे व्यवसायात नुकसान झाले आहे आणि आता बर्ड फ्लूचा देखील खूप वाईट परिणाम होतो आहे (What study says about the Risk of bird flu from eating chicken and eggs).
कोंबडीचे मांस खाणे सुरक्षित आहे का?
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार चिकन किंवा इतर कुक्कुटपालन उत्पादन योग्य प्रकारे शिजवल्यास ते खाण्यास सुरक्षित आहेत. यामुळे हा फ्लू पसरत नाही किंवा कोणालाही संसर्गित होत नाही. अहवालानुसार, पोल्ट्रीसंबंधित पदार्थ 70 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात शिजवले गेले पाहिजेत, जेणेकरून मांस कच्चे आणि लालसर राहणार नाही. जरी एखाद्या कोंबडीस संसर्ग झाला असेल तर, व्यवस्थित शिजवल्यामुळे H5N1 विषाणू मरेल. डब्ल्यूएचओच्या संशोधनानुसार, योग्यरित्या शिजवल्यानंतर कोणत्याही पोल्ट्री उत्पादनांमध्ये कोणताही रोग पसरत नाही. परंतु, जर पोल्ट्री उत्पादन अर्धवट शिजवलेले असेल, तर संसर्गाचा धोका वाढतो.
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री म्हणतात…
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, ‘कोंबडीची अंडी आणि मांस व्यवस्थित शिजवलेले असेल तर ते खाऊ शकता. त्यामुळे त्याचा संसर्ग होणार नाही. आतापर्यंत हा फ्लू मानवांमध्ये आढळलेला नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सरकारने सर्व राज्यांना सूचनापत्र देखील जारी केले आहेत. भविष्याचा विचार करून नियंत्रण कक्ष देखील तयार केले गेले आहेत.’
(What study says about the Risk of bird flu from eating chicken and eggs)
हेही वाचा :
Bird Flu Alert | ‘बर्ड फ्लू’पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा!#BirdFlu | #BirdFluSymptoms | #Precaustionhttps://t.co/qlh9XmcEJI
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2021