ब्रेकफास्टमध्ये नेमकं काय असावं? काय खाणं योग्य?

ऑफिस, बस किंवा ट्रेनमध्ये काही लोक खूप आळशी दिसतात हे तुम्ही पाहिलं असेल, कदाचित त्यांनी नाश्ता नीट केला नसेल. जाणून घेऊया ब्रेकफास्टमध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता.

ब्रेकफास्टमध्ये नेमकं काय असावं? काय खाणं योग्य?
breakfast foodImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 1:52 PM

सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्याच्या घाईत अनेकजण नाश्ता टाळतात, ही सवय पूर्णपणे आरोग्याच्या विरोधात आहे. नाश्ता हा एक महत्त्वाचा आहार आहे, तो खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसातील पहिले जेवण हेल्दी आणि एनर्जी बूस्टिंग असले पाहिजे, त्यासाठी थोडी सावधगिरीही आवश्यक आहे, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते. ऑफिस, बस किंवा ट्रेनमध्ये काही लोक खूप आळशी दिसतात हे तुम्ही पाहिलं असेल, कदाचित त्यांनी नाश्ता नीट केला नसेल. हे जेवण आपल्याला अंतर्गत ऊर्जा देते आणि पचनसंस्था देखील चांगली राखण्यास मदत करते. जाणून घेऊया ब्रेकफास्टमध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता.

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक ग्लास पाणी प्यावे. ब्रेकफास्टमध्ये शेंगदाणे आणि बियांचा समावेश करा. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहते आणि थकवा दूर होतो. हे शेंगदाणे आणि बिया तुम्ही रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खा. सकाळी याचे पाणी प्यावे. साधारण महिनाभर हा दिनक्रम पाळला तर शरीरात सकारात्मक बदल होतील.

रिकाम्या पोटी खा ‘या’ बिया आणि शेंगदाणे

  • मनुका
  • बदाम
  • काळे मनुके
  • सूर्यफूल बियाणे
  • फ्लॅक्स सीड्स
  • चणे
  • भोपळा बियाणे
  • अक्रोड
  • काजू
  • मखाना

या गोष्टींची चव वाढवण्यासाठी तुम्ही मध घालू शकता, आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दुधासोबत सेवन करू शकता. यामुळे शरीरात कधीही अशक्तपणा जाणवणार नाही.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.