एका महिन्यासाठी चहा आणि कॉफी सोडल्यास काय होईल? दिसतील हे 3 इफेक्ट्स
हे पेय तुम्ही काही दिवसांसाठी सोडा असं म्हटलं तर अनेकांना ते अशक्य होईल, कारण काहींना त्याचं अक्षरशः व्यसन असतं. चला जाणून घेऊयात जर एखादी व्यक्ती महिनाभर चहा-कॉफीपासून दूर राहिली तर त्याच्या शरीरात कोणते बदल होऊ शकतात.
मुंबई: जगभरातील कोट्यवधी लोकांचा एक कप चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. या हॉट ड्रिंक्सच्या फॅन्सची कमतरता नाही, ते दिवसातून अनेकवेळा त्यांचे सेवन करतात. कधी कधी तर चहा आणि कॉफी लव्हर्सचा स्वतःवर ताबा नसतो. जेव्हा मनात येईल तेव्हा ते याचं सेवन करतात. यामुळे मन ताजेतवाने होते आणि शरीराला झटपट ऊर्जा मिळते. पण चहा-कॉफी आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते, कारण त्यात कॅफिन असते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. हे पेय तुम्ही काही दिवसांसाठी सोडा असं म्हटलं तर अनेकांना ते अशक्य होईल, कारण काहींना त्याचं अक्षरशः व्यसन असतं. चला जाणून घेऊयात जर एखादी व्यक्ती महिनाभर चहा-कॉफीपासून दूर राहिली तर त्याच्या शरीरात कोणते बदल होऊ शकतात.
चहा आणि कॉफीमुळे थकवा दूर होत असला तरी यामुळे रक्तदाब वाढतो, हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या पेयांमध्ये कॅफिन आढळते, त्यामुळे जर तुम्ही महिनाभर चहा-कॉफी पिणे बंद केले तर तुमचा रक्तदाब नियंत्रणात येईल आणि हाय बीपीची तक्रार दूर होईल.
लहानपणी तुम्ही किती वेळ झोपायचात तुम्हाला किती झोप यायची आठवतंय का? पण जसजसे आपण मोठे होत गेलो तसतसे आपल्याला कॅफिनयुक्त पेय पदार्थांची सवय लागली आणि मग झोपेचा त्रास देखील होऊ लागला. चहा आणि कॉफी सोडल्यानंतर एका आठवड्याच्या आत, आपल्या झोपेत कमालीची सुधारणा दिसेल. एका महिन्यात तुम्ही स्वतः मध्ये मोठा फरक बघू शकाल. कॅफिनमुळे आपले न्यूरॉन्स सक्रिय होत असल्याने चहा-कॉफी प्यायल्याने झोप उडते. जर ही पेय सोडून दिलीत तर झोपेत कमालीची सुधारणा दिसेल. चांगली झोप येईल.
चहा-कॉफीसारख्या गरमागरम गोष्टी आपल्या दातांसाठी खूप हानिकारक असतात, त्यामुळे त्यांचा रंग तर निघून जातोच, शिवाय ते कमकुवतही होतात. जर तुम्ही महिनाभर चहा-कॉफी पिणे बंद केले तर तुमच्या दातांचे मोठे नुकसान टळेल आणि मग नवीन पांढरेपणा येऊ लागेल. चहा-कॉफी आम्लयुक्त असते ज्यामुळे दातांचे इनेमल खराब होऊ शकते. यामुळे दात खराब होतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)