Corona Update | कोरोनाची तिसरी लाट दिवाळीत धडकण्याची भीती, कसे सावध रहाल?

आपण नवीन व्हेरिंटचा शोध किती वेळात घेतो आणि त्याला कसे रोखतो? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. (Corona Third Wave likely to come in India)

Corona Update | कोरोनाची तिसरी लाट दिवाळीत धडकण्याची भीती, कसे सावध रहाल?
Corona Virus
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 12:01 PM

मुंबई : भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच तिसरी लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. पण ही लाट नेमकी कधी येणार, याचा प्रादुर्भाव किती काळ असेल, यातून कसे सरंक्षण करायचे याची अद्याप काहीही सांगता येत नाही. (When Corona Third Wave likely to come in India)

केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक विजय राघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते. पण जेव्हा ती येईल तेव्हा ती किती धोकादायक असेल, याबद्दल काहीही सांगता येणार नाही. कोरोनाचे रुपांतर सतत होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार असायला हवे. कोरोनाची लस प्रभावी आहे. पण त्यात अजून कशी सुधारणा करता येईल, यावर संशोधन सुरु आहे.

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ बंगळुरूचे एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. गिरीधर बाबू यांच्यामते, थंडीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती सर्वाधिक असते. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरूवातीला कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे त्यापूर्वी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. तसेच पुढील काळात तरुण लोकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो.

कोरोनाची तिसरी लाट ही तीन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून आहे. यातील पहिला घटक म्हणजे लसीकरण, दुसऱ्या सुपर स्प्रेडर, तिसरा नवी व्हेरिंटचा शोध घेणे. म्हणजे सर्वात आधी येत्या डिसेंबरपर्यंत आपल्याला कोरोना लसीकरण करावे लागेल. त्यानंतर दुसरे म्हणजे आपण सुपर स्प्रेडर इव्हेंटला किती रोखू शकतो. तिसरे म्हणजे आपण नवीन व्हेरिंटचा शोध किती वेळात घेतो आणि त्याला कसे रोखतो? यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

तिसरी लाट आल्यानंतर काय होणार? 

गणिताचे मॉडेल तज्ज्ञ प्राध्यापक एम. विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार ” कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. यातील काहींना कोरोना सदृश लक्षणही जाणवत नाहीत. पण तरीही त्यांना लागण झाल्याचे उघड होत आहे. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना सर्वप्रथम लस देणे गरजेचे आहे. पुढील सहा महिन्यात लसीकरणाचा कार्यक्रम तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसरी लाटेचा प्रभाव कमी होईल.

चाचणी सुविधा वाढवावी लागेल

डॉ. बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांनी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाययोजना करावी लागेल. त्यात सर्वात प्रथम लसीकरणाची योजना आखवी लागेल. दुसर्‍या लाटेतून बाहेर पडण्यासोबत आपल्याला कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्या लागतील. तसेच कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आक्रमक रणनीती तयार करण्याची गरज आहे. आपल्याला चाचणी सुविधा वाढवावी लागेल. पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे लागेल. त्या उभाराव्या लागतील.

कोरोनाची दुसर्‍या लाट ही 7 मे रोजी येऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. प्रोफेसर एम. विद्यासागर यांनी अलीकडेच 7 मे रोजी देशात दुसर्‍या लाटेचा कहर दिसू शकतो. त्यानंतर काही काळाने दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच विविध राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा विविध वेळी होऊ शकतो.  (When Corona Third Wave likely to come in India)

संबंधित बातम्या : 

Corona Cases India | देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, चार लाखांहून अधिक नवे रुग्ण, एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.