मुंबई: हिवाळ्यात लोक भरपूर ड्रायफ्रूट्स खातात. यामुळे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण उन्हाळ्याच्या ऋतूत खाण्या-पिण्याचं थोडं टाळलं जातं. त्याचप्रमाणे ड्रायफ्रुट्सचा विचार केला तर लोक संभ्रमात पडतात, उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्स खाणं योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात तुम्ही ड्रायफ्रूटमधील अक्रोड आरामात खाऊ शकता. खरं तर अक्रोडमध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे ते उन्हाळ्यातही खाल्ले जाऊ शकते. मात्र या ऋतूत अक्रोड खाण्याची पद्धत थोडी बदलते.
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात असते, जे निरोगी शरीरासाठी तसेच निरोगी मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, अक्रोड जळजळ कमी करणे, हृदयाचे आरोग्य सुधारणे यासह इतर बरेच फायदे देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात अक्रोडचा आहारात कसा समावेश करता येईल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)