Omicron : ‘ओमिक्रॉन’ संसर्गजन्यतेवर जागतिक आरोग्य संघटनेचे भाष्य; वाचा- नेमके काय म्हणाले?
कोरोना व्हेरियंटच्या संसर्गाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षेत्रीय निर्देशक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी अन्य व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन बाबत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
![Omicron : 'ओमिक्रॉन' संसर्गजन्यतेवर जागतिक आरोग्य संघटनेचे भाष्य; वाचा- नेमके काय म्हणाले? Omicron : 'ओमिक्रॉन' संसर्गजन्यतेवर जागतिक आरोग्य संघटनेचे भाष्य; वाचा- नेमके काय म्हणाले?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/12/15011244/OMICRON-NEW-1.jpg?w=1280)
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉन (Omicron Variant) सर्वाधिक घातक समजला जात आहे आणि सर्वाधिक वेगाने जगभरातील देशात नव्या व्हेरियंटचा प्रसार होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सतर्कता जारी केली आहे. नव्या व्हेरियंटचा प्रतिकार करण्यासाठी कोविड अनुरुप व्यवहारांचे अनुपालन करण्याच्या दिशानिर्देश जारी केले आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटकडे दुर्लक्ष न करता गांभीर्य बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण अनेकजण अजूनही ओमिक्रॉनला गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीत.
कोरोना व्हेरियंटच्या संसर्गाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षेत्रीय निर्देशक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी अन्य व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन बाबत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे. वृत्तसंस्था ‘एएनआय’ संस्थेशी मुलाखतीदरम्यान डॉ. सिंह यांनी ओमिक्रॉनच्या नव्या लक्षणांबद्दल माहिती दिली आहे.नवा व्हेरियंटची घातकता 1. व्हेरियंटची संसर्गजन्यता 2. कोविड प्रतिबंधित लशीची उपयुक्तता 3. अन्य व्हेरियंटच्या तुलनेत असलेल्या घातकता या तीन मुद्द्यांवर अवलंबून असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.
ठोस माहितीचा अभाव:
वर्तमान स्थितीत उपलब्ध वैज्ञानिक पुरावे तुटपुंजे आहेत. दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन संसर्ग दराचे आकडे वाढत आहेत. मात्र, ठोस निष्कर्ष मिळविण्यासाठी माहितीची अधिक आवश्यकता आहे. ओमिक्रॉन संबंधित वैज्ञानिक पुरावे अद्याप मर्यादित आहे. काही आठवड्यांची अद्याप प्रतीक्षा आसल्याने ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचे मत डॉ. सिंग यांनी म्हटले आहे. ओमिक्रॉनग्रस्त रुग्णांची वैद्यकीय माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. कोविड लशीची एक मात्रा तसेच दोन्ही मात्रा घेतलेल्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉन विषाणूशी मुकाबला करण्याची क्षमता तपासली जाणार असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितलं.