AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Acidity Problems : ॲसिडिटीमुळे का सुरू होते डोकेदुखी ? जाणून घ्या कारण

आपल्यापैकी बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास जाणवतो. वेळी-अवेळी आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतांश जणांना ॲसिडिटी होतेय. पण काही लोकांना ॲसिटिडीमुळे इतर समस्याही सहन कराव्या लागतात.

Acidity Problems : ॲसिडिटीमुळे का सुरू होते डोकेदुखी ? जाणून घ्या कारण
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 11:22 AM

नवी दिल्ली – ॲसिड रिफ्लेक्स ही एक गंभीर स्थिती आहे. जेव्हा पोटातील ॲसिड (आम्ल) (acid) अन्ननलिकेमध्ये परत येते तेव्हा ही स्थिती उद्भवते. यामुळे मळमळ होऊ शकते, तसेच छातीत जळजळ होऊ शकते. काही लोकांना ॲसिडिटी (acidity) किंवा ॲसिड रिफ्लेक्सच्या वेळी डोकेदुखीचा त्रासही होतो. ज्यामुळे समस्या वाढतात. ॲसिडिटी आणि डोकेदुखी (headache) यांच्यामध्ये काय संबंध आहे ते जाणून घ्या.

ॲसिडिटीमुळे डोकेदुखी होते का ?831020

ॲसिडिटी ही सामान्यतः डोकेदुखी आणि मायग्रेनशी संबंधित आहे. हे आतडे-मेंदूच्या अक्षामुळे होते. आतडे आणि मेंदू यांचा संबंध आहे. अनेक अभ्यासांद्वारे गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लेक्स रोग आणि डोकेदुखी यांच्यातील मजबूत संबंध ओळखला आहे.

हे सुद्धा वाचा

जेव्हा पोटातील ॲसिड अन्ननलिकेमध्ये परत जाते तेव्हा ॲसिड रिफ्लेक्स होतो, त्यानंतर रीगर्जिटेशन आणि छातीत जळजळ होते. ही एक क्षणिक किंवा सतत स्थिती असू शकते. ॲसिड रिफ्लेक्ससह डोकेदुखी किंवा मायग्रेनचा अनुभव येऊ शकतो. एका अभ्यासानुसार, ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास होतो त्यांना ॲसिड रिफ्लेक्सचा धोका जास्त असतो. तसेच, ज्या लोकांना वारंवार डोकेदुखीचा अनुभव येतो त्यांना कमी डोकेदुखी असलेल्या लोकांपेक्षा ॲसिड रिफ्लेक्सची चिंता जास्त असते.

तज्ज्ञांच्या मते, डोकेदुखीच्या गोळ्या, नॉन-स्टेरॉइडल, अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स किंवा पेन किलर यांसारखी औषधे प्रत्यक्षात ॲसिडिटी वाढवू शकतात. डोकेदुखीमुळे ॲसिडिटी होऊ शकते आणि त्याउलट आणि मायग्रेन देखील इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारख्या इतर परिस्थितींशी संबंधित आहे.

ॲसिडिटी मॅनेज करण्यासाठी टिप्स

– आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून ॲसिडिटीमुळे होणारी डोकेदुखी कमी करता येऊ शकते.

– विशेषत: रात्रीच्या जेवणात मसालेदार, फॅटी किंवा खूप जड अन्न खाऊ नये.

– ॲसिडिटी वाढवणाऱ्या अन्नाचा आहारात समावेश करू नये, त्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

– धूम्रपान आणि मद्यपान कमी करावे किंवा पूर्णत: बंद करावे.

– रात्रीचे जेवण लवकर घ्यावे, 7 ते 8 दरम्यान जेवावे. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासांचे अंतर असावे. असे केल्याने आडवे पडल्यामुळे होणारे ॲसिड रिफ्लेक्स कमी करण्यास आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत करेल.

– अतिरिक्त वजन कमी केल्यानेही ॲसिडिटी आणि डोकेदुखीशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत मिळेल.

– इतर कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा त्रास वाढण्याची शक्यता असते.

ॲसिडिटी आणि थकवा

ॲसिड रिफ्लेक्स झाल्यास झोप लागणे मुश्किल असते. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तसेच, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ॲसिड रिफ्लेक्सची लक्षणे अधिक तीव्र होतात, कारण ॲसिड अन्ननलिकेमध्ये परत जाणे सोपे आहे. जीईआरडी असलेल्या लोकांना झोपेची समस्या जास्त असते. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूच्या कार्यांमध्ये व्यत्यय येत असल्याने, ॲसिड रिफ्लेक्सच्या परिणामी तुम्हाला डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो. समस्या कायम राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.