सीलबंद पाण्याची ‘एक्स्पायरी’ तपासली का? जाणून घ्या महत्वाची कारणे
तुम्ही पिण्यासाठी सीलबंद पाणी खरेदी केल्यास त्यावर तुम्हाला समयसमाप्ती तारीख(एक्स्पायरी डेट) ठळक अक्षरात लिहिलेली दिसून येईल. वैज्ञानिकरित्या पाणी कधीही शिळं होतं नाही हे आपण जाणतोच. असं असतानाही सीलबंद पाण्याच्या बाटलीची एक्स्पायरी होणं म्हणजे नेमकं काय?
नवी दिल्ली- पाण्याविना जीवनाची अपूर्णता आपणा सर्वांना माहितीच आहे. जीवनदायक ठरणाऱ्या पाण्यात आरोग्यवर्धक गुणवैशिष्ट्यही सामावलेली असतात. मौल्यवान पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणं तितकंच महत्वाचे ठरते. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यापैकी 97 टक्के पाणी आजही पिण्यायोग्य नाही. केवळ पृथ्वीवरील तीन टक्के पाणी पिण्यास उपलब्ध आहे. जागतिक लोकसंख्येच्या वाढीचं प्रमाण आणि पिण्यायोग्य पाण्याचा उपलब्ध साठा यांचे व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे पाण्याचा काळजीपूर्वक वापर अत्यंत मोलाचा ठरतो.
तुम्ही पिण्यासाठी सीलबंद पाणी खरेदी केल्यास त्यावर तुम्हाला समयसमाप्ती तारीख(एक्स्पायरी डेट) ठळक अक्षरात लिहिलेली दिसून येईल. वैज्ञानिकरित्या पाणी कधीही शिळं होतं नाही हे आपण जाणतोच. साठवण तलावातही पाण्याची साठवणूक करुन टप्प्याटप्याने पाणी पुरवठा केला जातो. असं असतानाही सीलबंद पाण्याच्या बाटलीची एक्स्पायरी होणं म्हणजे नेमकं काय? तुमच्या मनात निर्माण झालेल्या शंकांची उत्तरे पॉईंट टू पॉईंट जाणून घेऊया:
पाण्याला एक्स्पायरी कशी?
प्रवासानिमित्त असो किंवा कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडताना स्वतः सोबत पाणी बाळगतोच. आपण सर्व बाळगण्यास सोयीस्कर व्हावं या हेतूनं सीलबंद पाण्याची बाटली खरेदी करण्यास प्राधान्य देतो. मात्र, पाण्याच्या बाटलीवर असलेल्या एक्स्पायरी डेटमुळे मनात प्रश्न निर्माण होतात. एक्स्पायरी झालेले पाणी खरंच पिण्यायोग्य असते का?
पाणी 6 महिने ‘एक्स्पायरी फ्री’, पण…
पाणी सहा महिन्यांपर्यंत खराब होत नाही असे प्राथमिक अनुमान लावले जाते. तुम्ही पाण्याला अधिक तापमानात ठेवल्यास किंवा उष्णतेपासून संरक्षण करण्यास अक्षम ठरल्यास पाणी निश्चितच खराब होऊ शकते. पाणी कार्बोनेटेड झाल्यास पाण्याच्या चवीत निश्चितपणे बदल होतो तसेच उष्णता वायूच्या स्वरुपात बाहेर पडण्यास सुरुवात होते. मात्र, वैज्ञानिकांच्या मतानुसार पाणी एवढ्या लवकर कधीही ‘एक्स्पायर’ होत नाही.
सीलबंद बाटलीतील पाण्याचं रहस्य
सर्वसाधारण पाण्याच्या तुलनेत सीलबंद पाणी लवकर एक्सपायर होण्याची शक्यता असते. यामागे दडलेलं कारण म्हणजे पाणी सीलबंद करण्यासाठी वापरण्यात आलेली प्लास्टिकची बाटली. सर्वसामान्यपणे प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्याची एक्सपायरी डेट 2 वर्षापर्यंत असू शकते. मात्र, जेव्हा पाण्याची बाटली थेट सूर्यप्रकाशात आल्यास बाटलीतील पॉलिथीनचे विघटन होण्यास सुरुवात होते. थेट पाण्यात विरघळण्याचा देखील धोका असतो. यामुळे पाण्याचा चवीसोबत रंगातही बदल जाणवतो. अशाप्रकारच्या प्रक्रियेतील पाणी मानवी आरोग्यासह मोठ्या प्रमाणात अपायकारक ठरू शकते.
यासोबतच सीलबंद पाणी विक्री करणाऱ्या कंपन्याद्वारे सोडा बनविण्यास वापरण्यात येणाऱ्या मशीनचाच वापर केला जातो. याकारणांमुळेच पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट ठळकपणे नमूद केलेली असते
एक्स्पायर्ड पाणी पिण्याचे धोके
तुम्ही मुदत संपलेल्या बाटलीतून पाणी पित असल्यास तुम्हाला पचनसंस्थेच्या विकारांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच तुमच्या पचनसंस्थेवरही मोठा परिणाम निश्चितच जाणवू शकतो. त्यामुळे कोणत्याही वेळी पाणी पिण्यापूर्वी बाटलीची एक्स्पायरी डेट नक्कीच तपासा.
( केवळ वाचकांच्या माहितीसाठी सामान्यपणे माहिती प्रदान करण्यात आली आहे. अधिकाधिक माहितीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तथ्यांची पडताळणी करणं महत्वाचे आहे.)
VIDEO: नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, बढाया मारत नाही; नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचले