रात्री पाय सुन्न होण्याचे काय असते कारण? वारंवार होत असेल हा त्रास, तर लगेच सावधान!

जर तुम्हाला हाता-पायाला पिन किंवा सुई टोचल्यासारखे वारंवार वाटत असेल, अन्य काही लक्षणे दिसत असतील व त्यामागे काही कारण दिसत नसेल तर हा त्रास शरीरातील एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. मात्र, बऱ्याच वेळा शरीरातील एखाद्या नसेवर दाब पडल्यानेही असा त्रास होऊ शकतो, जे थोड्या वेळाने ठीक होते.

रात्री पाय सुन्न होण्याचे काय असते कारण? वारंवार होत असेल हा त्रास, तर लगेच सावधान!
पायाला मुंग्या येणे Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 12:36 PM

झोपल्यानंतर हात किंवा पाय सुन्न होणे अथवा त्यामध्ये झिणझिण्या (hand- leg geeting numb) येणे हे साधरणत: वेदनारहित असते. अशा वेळी हाता-पायाला खूप मुंग्या आल्यासारखे किंवा त्या भागात कोणी सुई टोचल्यासारखे वाटत राहते. पाठीची समस्या किंवा आसपासच्या ऊती जाड होणे, यासारख्या शारीरिक समस्यांमुळे (body) मज्जातंतूवर दबाव पडल्याचा परिणाम म्हणूनही हे होऊ सकते. हात -पाय सुन्ना होण्याचा हा त्रास दिवसा किंवा रात्रीच्या कोणत्याही वेळी होऊ शकतो. मात्र हा त्रास (reason behind the problem) होण्यामागचे नेमके कारण काय ? शरीरातील एखाद्या आजाराचे तर हे लक्षण नाही ना, याबद्दल जाणून घेऊया. एनआयएच नुसार, हाता-पायाला मुंग्या येणे किंवा सुई टोचल्यासारखे वाटणे याला वैद्यकीय भाषेत ‘ पॅरेस्थेसिया ‘ असे म्हटले जाते. बहुतांश वेळा, यामागचे कारण सोपे असते. काही वेळा आपण एका कुशीवर झोपतो तेव्हा हातावर दबाव पडल्याने हा त्रास होऊ शकतो. अशा वेळी नसांमध्ये रक्तपुरवठा (blood-flow) नीट न झाल्यामुळे हात किंवा पाय सुन्न होऊ शकतो.

हात व पाय सुन्न होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. बहुतेक लोकांना कधी ना कधी याचा अनुभव होतो. तथापि, सुन्न होण्याची ही संवेदना बऱ्याचा कालावधीसाठी टिकू शकते किंवा इतर लक्षणांसह असू शकते. असे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हात-पाय सुन्न होण्याची ही संवेदना शरीरात अंतर्गतरित्या वाढणाऱ्या एखाद्या रोगाचा संकेत असू शकते.

हे सुद्धा वाचा

व्हिटॅमिन बी च्या कमतरतमुळे हात-पाय होतात सुन्न –

एनसीबीआय मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे शरीराला मुंग्या येणे किंवा सुन्नपणा येणे, असा अनुभव येतो. व्हिटॅमिन बी चे बरेच प्रकार आहेत आणि हे सर्व पेशींचे आरोग्य राखण्यास आणि आपल्याला उत्साही, उर्जावान ठेवण्यास मदत करतात. जरी बऱ्याच लोकांना त्यांच्या आहाराद्वारे पुरेसे बी जीवनसत्त्वे मिळत असली तरी काही लोकांना दैनंदिन जीवनातील ( व्हिटॅमिन बी ची) ठराविक मात्रा पूर्ण करण्यासाठी पूरक आहार घेण्याची आवश्यकता असते.

शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असणे –

शरीरात पाण्याचे जमा होणे, हे अनेक गोष्टींमुळे होऊ शकते. त्यामध्ये जास्त प्रमाणात मीठाचे सेवन करणे आणि मासिक पाळी दरम्यान हार्मोनच्या पातळीत चढ-उतार होणे यांचा समावेश असतो. यामुळे संपूर्ण शरीरात जळजळ होऊ शकते, सूज येऊ शकते किंवा ते शरीराच्या काही भागात देखील जमा होऊ शकते. ज्यामुळे शरीराच्या प्रभावित भागात मुंग्या येणे अथवा झिणझिण्या येणे, असा त्रास होऊ शकतो.

​कार्पल टनल सिंड्रोम –

कार्पल टनल सिंड्रोममुळे हात आणि पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, हा त्रास होऊ शकतो. जेव्हा मध्यम मज्जातंतू संकुचित होतात किंवा त्यांना चिमटा बसतो, तेव्हा ही स्थिती उद्भवते. एकच क्रिया पुन्हा-पुन्हा करणे, उदा- की-बोर्डवर टाइप करणे किंवा यंत्रसामग्रीने काम करणे, यासारख्या क्रिया सतत केल्याने ही स्थिती वारंवा उद्भवू शकते.

​पेरीफेरल न्यूरोपॅथी –

जर तुम्हाला मधुमेह असेल आणि नियमितपणे पॅरेस्थेसियाचा अनुभव येत असेल तर हे मज्जातंतूचे नुकसान झाल्यामुळे होऊ शकते. यास, ‘ परिधीय न्यूरोपॅथी ‘ म्हटले जाते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.

मज्जासंस्थेत बिघाड झाल्याचे लक्षण –

मल्टीपल स्केलेरॉसिस आणि स्ट्रोक सारख्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करणारी परिस्थिती ही देखील पॅरेस्थेसिया साठी कारणीभूत ठरू शकते. मेंदू किंवा मणक्यात असलेल्या गाठी अथवा ट्यूमर मुळे , ते ट्रिगर होऊ शकते.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.