Pregnancy Problems | प्रसुतीनंतर ताप येतोय, घाबरण्यांचं कारण नाही! जाणून घ्या काय आहेत कारणं…
मातृत्वापेक्षा मोठं सुख नाही. गूड न्यूज आली की 9 महिने आणि प्रसुतीनंतरचे 2 महिने महिलांसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्या वर्षभराच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. अनेक उलथापालथ होते. रोजच्या जगातील अनेक गोष्टी बदलतात. या सगळ्यांसोबत तिला सतत झगडावं लागतं. अनेक गोष्टी नवीन असतात, त्या का होत्यात हे समजून घ्यावं लागतं. अगदी प्रसुतीनंतरही महिलांना शरीराची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अनेक महिलांना ताप येतो. हा ताप येण्यामागची अनेक कारणं असतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : बाळाला जन्म देताना एका आईला प्रसुतीच्या वेदना सहन कराव्या लागतात. जुनी लोकं म्हणतात हा आईचा पुनर्जन्म असतो. या काळात महिलेला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. शरीरातील अनेक बदल तिला समजण्यापलिकडले असतात. प्रसूतीसाठी की आईची सगळ्या वेदनातून सुटका असं अनेकांना वाटतं. पण असं नाही प्रसुतीनंतरचा काळही तेवढ्याच त्रासदायक आणि वेदनेने भरलेला असतो. अनेक महिलांना प्रसूतीनंतर ताप येतो. प्रसूतीनंतर महिलेच्या शरीराचे तापमान साधारण 100.4 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त वाढलेलं असतं. या तापाला डॉक्टरी भाषेत पोस्ट पार्टम फिव्हर म्हणतात. हा ताप एंडोमेट्रिओसिस, मूत्रमार्गात संसर्ग किंवा शस्त्रक्रियेच्या जखमेच्या संसर्गामुळे येतो.
सिजेरियनमध्ये तापाची शक्यता जास्त
नार्मल प्रसूतीपेक्षा सिजेरियन प्रसूतीमध्ये तापाचं प्रमाण जास्त असतं. सिजेरियन करण्यासाठी करण्यात आलेली शस्त्रक्रियेमुळे काही इन्फेक्शन झाल्यास ताप येतो. गर्भाशयात इन्फेक्शन, जखमेमध्ये इन्फेक्शन होणे, टाके दुखणे त्यात पू तयार होणे यामुळे महिलांना ताप येतो.
तापाची इतर कारणं
याशिवाय छातीत दुधाच्या गाठी तयार होणे यामुळेही महिलांना ताप येतो. तर, मूत्रमार्गाचा संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सिस, मलेरिया, टायफॉइड आणि योनीमार्गाचा संसर्ग यांसारख्या कारणांमुळेही ताप येण्याची भीती असते.
ताप येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
मुख्य:तहा प्रसूतीनंतर आईला ताप येऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हायजीन ठेवणे जास्त गरजेचं आहे. टाके असलेल्या ठिकाणी खास करुन स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे. बाथरुम स्वच्छ ठेवणे. मूत्रमार्गाने संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुधाची गाठी तयार होऊन येणे याची काळजी घ्यावी. बाळंतीण आणि बाळ असलेल्या खोलीची स्वच्छता ठेवावी. त्या खोलीत बाहेर कोणीही जाऊ नये.
आईच्या तब्येतीत इतर कुठल्या गोष्टी लक्ष द्यायच्या
- अंगावरून जाणाऱ्या पाण्याला घाण वास येणे.
- अंगावरून जास्त जाणे.
- पोट जास्त दुखणे.
- लाल पाणी सुरू राहणे.
कुठल्याही गोष्टी आढळल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा :
तुम्हाला या सवयी आहेत…त्याचा होऊ शकतो मुलांवर परिणाम…तर सोडा या सवयी
हिवाळ्यात दिवसाची सुरुवात एक कप हळदीच्या चहाने करा आणि निरोगी राहा!