जेवण झाल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते, शरीर कंप होते?; जाणून घ्या त्यामागची वैज्ञानिक कारणे

जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरातील तापमान स्वाभाविक स्वरूपाने बदलत राहते. खरेतर तापमानामध्ये बदल होणे हे काही फारसे गंभीर कारण नाही, परंतु जर तुमच्या सोबतसुद्धा असे प्रत्येक वेळी होत असेल तर यामागची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे.

जेवण झाल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते, शरीर कंप होते?; जाणून घ्या त्यामागची वैज्ञानिक कारणे
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 12:22 AM

आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत ही घटना वारंवार घडताना दिसत असते, जसे की जेवण (Mealsझाल्यानंतर अचानक आपल्याला थंडी वाजू लागते. तसे तर अनेकदा आपण जेव्हा मसालेदार पदार्थ (Spicy foods) खातो त्यानंतर शरीरामध्ये गर्मी जाणवू लागते परंतु थंडी वाजणे ही एक सर्वसाधारण बाब आहे. हिवाळ्याच्या दिवसांत जेव्हा आपण आईस्क्रीम (Ice cream) सारखे थंड पदार्थ खातो त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अचानक थंडी वाजून येते त्यानंतर शरीरामध्ये कंपण सुद्धा होताना जाणवते. अशावेळी आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा आपण खाद्यपदार्थ सेवन करत असतो, तेव्हा त्या खाद्यपदार्थांचा आपल्या शरीरातील तापमानाशी काही संबंध असतो का? असल्यास नेमका काय. जेवनानंतर आपल्याला थंडी का वाजते? याबाबत तज्ज्ञांचे नेमके म्हणणे काय या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञ काय म्हणतात?

या परिस्थितीवर तज्ञ मंडळीचे म्हणणे आहे की, आपण जे काही अन्नपदार्थ खात असतो त्या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावरील तापमानावर प्रामुख्याने जाणवताना दिसतो. पचन प्रक्रिया घडत असताना या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावरील तापमानावर सुद्धा होतो आणि अशावेळी आपल्या शरीराचे तापमान प्रामुख्याने बदलत असते. आपल्या शरीराच्या तापमानामध्ये होणारे बदल याकडे अनेकांचे लक्ष जात नाही. तसेतर शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ यामुळे अनेकांना जेवण केल्यानंतर गरमी होण्याऐवजी थंडी वाजू लागते विशेष करून हे जेव्हा घडते तेव्हा तुम्ही काहीतरी गरमागरम पदार्थ खाल्ले असतील अशा वेळी हे चिंता करण्याचे कारण ठरू शकते. न्यूट्रिशन एक्सपर्ट यांचे म्हणणे असे आहे की ,जर तुम्हाला सुद्धा जेवण केल्यानंतर लगेच थंडी वाजत असेल किंवा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे कंपण होत असेल तर अशा वेळी तुम्हाला सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तुम्ही घेत असलेला आहार तुमच्या शरीराच्या तापमानासाठी कारणीभूत ठरू शकतो, त्यामागे वेगवेगळी कारणे सुद्धा असू शकतात

कमी कॅलरीचे सेवन

काही प्रमाणात कमी कॅलरीचे केलेले सेवन यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व तर मिळतात पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील तापमान नियंत्रण करण्यासाठी सुद्धा कॅलरीची महत्त्वाची भूमिका असते. 2018 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासांतर्गत असे सिद्ध झाले की जे लोक दीर्घकाळापासून जास्त प्रमाणामध्ये किंवा नियंत्रणामध्ये कॅलरीचे डाएट फॉलो करत असतील तर अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण आपल्याला नियंत्रणात पाहायला मिळते तसेच अशा व्यक्तींचे शारीरिक तापमान सुद्धा जास्त नसते. त्यांच्या शरीरामध्ये कॅलरीची कमतरता असू शकते आणि म्हणूनच अशा वेळी जेवण केल्यानंतर त्यांना थंडी वाजू लागते.

इंटरमिटेंट फास्टिंग

इंटरमिटेंट फास्टिंग हा जेवण्याचा एक पॅटर्न आहे ज्यामध्ये तुम्ही वेळोवेळी उपवास धरतात आणि जेवण करतात.या प्रकारच्या पॅटर्नमध्ये 14-16 तासांसाठी 8-10 तासांत विंडो ईटिंग सोबतच इंटरमिटेंट फास्टिंग करावी लागते. NCBI (2) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातर्गत असे मानले गेले आहे की ,इंटरमिटेंट फास्टिंग ब्लड शुगर लेवलला कमी करते ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये तणाव वाढू लागतो तणाव वाढल्यामुळे शरीरातील तापमानामध्ये सुद्धा कमतरता निर्माण होते यामुळे व्यक्तीला थंडी वाजून येते. जर तुम्हाला सुद्धा इंटरमिटेंट फास्टिंग दरम्यान नेहमी थंडी वाजून येत असेल तर अशावेळी हा संकेत दर्शवतो की तुम्हाला विंडो इटिंग दरम्यान आपल्या शरीरासाठी कॅलरीचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे.

थंड पदार्थ किंवा पेय यांचे सेवन

थंड पदार्थ खाल्ल्याने किंवा पेय प्यायल्याने शरीरातील तापमानामध्ये बदल जाणवू लागतो. IOSR जर्नल ऑफ नर्सिंग अँड हेल्थ सायंसमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार असे सिद्ध झाले आहे की, थंड पाणी किंवा अन्य कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपल्या शरीराचे तापमान 5 मिनिटानंतर 0.28 डिग्री सेल्सियस कमी होते आणि यामुळे आपल्या शरीरातील तापमानात आपल्याला फरक जाणवू लागतो.

रक्ताची कमतरता

जेव्हा आपल्या शरीरातील पेशींमध्ये रक्ताचे योग्य प्रमाणात मात्रा उपलब्ध नसते तेव्हा अनेकांना एनिमिया सारख्या आजारा उद्भवण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील रक्त पेशी आपल्या फुफ्फुसा जवळ असणाऱ्या सर्व अवयवांना रक्तपुरवठाचे कार्य करत असते. याच्या माध्यमातूनच आपल्या शरीरातील अन्य अवयवांना सुद्धा ऑक्सीजनची मात्रा तसेच पुरवठा देखील होत असतो. PubMed Central मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासा अंतर्गत असे सिद्ध झाले आहे की आपल्याला वारंवार थंडी वाजने हे एनीमियाचे कारण सुद्धा असू शकते. ही समस्या उद्भवणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे सुद्धा अशा प्रकारची समस्या उद्भवू लागते तसेच म्हणूनच अनेकदा काही व्यक्ती थंड पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये कंपण होते याचे प्रमुख कारण म्हणजे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची कमतरता होय.

हायपोथायरॉइडिज्म

जेवण झाल्यानंतर सातत्याने थंडी वाजणे यामागील कारण हायपोथायरॉइडिज्म देखील असू शकते. ही अशा प्रकारची स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या शरीराला पर्याप्त प्रमाणात थायरॉईडचे हार्मोन निर्मिती होत नाही.हायपोथायरॉइडिज्म मध्ये आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम स्थिती धीम्या गतीमध्ये कार्य करू लागते. आणि अशावेळी आपल्या शरिरातील गरमीचे प्रमाण कमी होऊ लागते अशा वेळी जेवण झाल्यानंतर आपल्याला जास्त थंडी वाजू लागते

​डायबिटीज

डायबिटीज हा एक मेटाबॉलिक आजार आहे, जो हाय ब्लड शुगरचे कारण बनू शकतो. आपण जर डायबिटीज वर नियंत्रण करू शकलो नाही तर यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अनेक समस्या भविष्यात निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या शरीरामध्ये डायबिटीसची मात्रा जास्त प्रमाणामध्ये झाली असेल तर अशा वेळी आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही त्यामुळे जेवण केल्यानंतर गरमी ऐवजी शरीरामध्ये थंडी जाणवू लागते.

काही पदार्थ चे सेवन केल्यानंतर शरीरामध्ये थंडी वाजू लागली की सर्वसाधारण बाब असते परंतु तुम्हाला नेहमीच जेवण केल्यानंतर वारंवार थंडी वाजत असेल किंवा शरीरामध्ये कंपण जाणवत असेल तर अशा वेळी डॉक्टरांना याबाबत माहिती करून देणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता असू शकते.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या

कॅन्सरच्या उपचारातील भेदभाव दूर करा, तज्ज्ञ काय सांगतात? वाचा सविस्तर

अनेक आजारपणात रामबाण औषध ठरते काळे मिठ! वाचा काळ्या मिठाचे थक्क करणारे फायदे

आईग्गं!! 155 किलोची गर्भवती, ना मापाचा वजन काटा, ना ऑपरेशन टेबल, ना गाऊन.. औरंगाबादेत शर्थीचे प्रयत्न!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.