Hair Loss in Dieting : वजन कमी करणे आणि केसगळती यांचा काय संबंध ? जाणून घ्या सर्वकाही..

वेट लॉसच्या प्रवासात किंवा डाएट करताना शरीरात तणाव निर्माण होणे आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. त्याशिवाय केसही वेगाने गळू लागतात.

Hair Loss in Dieting : वजन कमी करणे आणि केसगळती यांचा काय संबंध ? जाणून घ्या सर्वकाही..
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 7:42 AM

नवी दिल्ली – आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाली की त्यामुळे लगेच नकारात्मक परिणाम (negative impact)दिसू लागतो. वजन कमी करण्याच्या प्रवासात किंवा डाएटिंग दरम्यान शरीरात तणाव आणि हार्मोनल असंतुलन (hormonal imbalance) यांसारख्या समस्या सुरू होतात असे बहुतेक वेळा पाहिले जाते. वजन कमी करताना केस गळणे (hair fall) बहुतेकदा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय इतरही असे अनेक परिणाम आहेत जे अचानक आणि जलद वजन कमी केल्याने तुमच्या शरीरावर होऊ शकतात.

वजन कमी केल्यानंतर केस का गळतात ?

एका संशोधनानुसार , वजन अचानक कमी होणे आणि खराब आहार हे तीव्र टेलोजन इफ्लुव्हियमशी संबंधित आहे, जे केस गळतीच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. संशोधनात असे म्हटले आहे की केस गळणे हे वजन वाढणे आणि प्रतिबंधित आहाराशी संबंधित पोषक तत्वांच्या कमतरतेशी जोडलेले आहे. क्रॉनिक टेलोजेन इफ्लुव्हियम, जे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकते आणि एंड्रोजेनेटिक बाल्डनेस, ज्याला अनेकदा पुरुष किंवा स्त्रिया टक्कल पडणे असे समजतात, ही याची काही उदाहरणे आहेत. आपले केस योग्य प्रकारे वाढण्यासाठी पुरेशा कॅलरी आणि पोषक तत्वांची गरज असते. जेव्हा शरीराला ते मिळत नाही, तेव्हा केस गळण्यासारखे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

डाएटिंग आणि केसगळतीमधील संबध

क्रॅश डाएटिंग, हे यो-यो डायटिंग म्हणूनही ओळखले जाते, हा एक अतिशय कमी-कॅलरी असलेला आहार असतो, ज्यामुळे आपले वजन लवकर कमी करण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की केस गळणे हे जलद वजन कमी होणे, कॅलरी निर्बंध, व्हिटॅमिनची कमतरता आणि क्रॅश डाएटचे पालन केल्यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाशी संबंधित असते. प्रथिनांचे बिल्डिंग ब्लॉक्स असणारे अमीनो ॲसिड केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. केसांचे प्रमुख संरचनात्मक प्रोटीन्स केराटिनच्या निर्मितीसाठी अमीनो ॲसिडची आवश्यकता असते.

तुमच्या आहारात प्रथिनांची कमतरता असेल तर केस गळू शकतात. त्यामुळे प्रोटीन्स नसणाऱ्या कमी-कॅलरी असलेल्या वजन कमी करण्याच्या प्लानचे पालन करत असाल तर केसगळतीचा अनुभव येऊ शकता. लोह, जस्त, प्रथिने, सेलेनियम आणि आवश्यक फॅटी ॲसिडच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. तसेच हे खूप कमी कॅलरी आहाराशी देखील जोडलेले आहे.

केसगळणे हानिकारक असते का ?

केस गळणे हे फारसं धोकादायक नसतं, पण वजन कमी झाल्यानंतर केस गळणे हे समस्या निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, पोषक तत्वांची कमतरता आणि जास्त कॅलरी निर्बंधामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकता. केस गळण्याच्या इतर संभाव्य कारणांमध्ये लोहाची कमतरता, अशक्तपणा, संज्ञानात्मक कार्य कमी होणे, वंध्यत्व, हृदय समस्या, नैराश्य आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यामध्ये बदल यांचा समावेश होतो. शरीराला पुरेशी कॅलरी आणि प्रोटीन्सन मिळाल्याने धोकादायक साइड इफेक्ट्स होऊ शकतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.