आईसक्रीम खाल्ल्यावर अचानक डोके दुखतेय? मेंदू सुन्न होण्याच्या समस्यापासून करा अशा प्रकारे सुटका!

Why does ice cream cause brain freeze: आइसक्रीम खाल्ल्यावर अनेकदा डोकेदुखी जाणवू लागते. या डोके दुःखीला अनेकदा मेंदू सुन्न होणे असे देखील म्हटले जाते. अशा प्रकारची डोकेदुखी काही काळासाठी होत असते, चला तर मग जाणून घेवूया या मागील नेमके कारण...

आईसक्रीम खाल्ल्यावर अचानक डोके दुखतेय? मेंदू सुन्न होण्याच्या समस्यापासून करा अशा प्रकारे सुटका!
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 7:25 PM

मुंबईः आपल्यापैकी प्रत्येकाला आईस्क्रीम खाणे (ice-cream eating) आवडत असते. असा एखादा व्यक्ती असेल, जो आईस्क्रीम खात नसेल. बाजारामध्ये आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असतात. अनेकदा आपण जेवण झाल्यावर किंवा बाहेर फिरायला गेल्यावर आईस्क्रीम हमखास खात असतो. अनेकदा आइसक्रीम खाल्ल्यावर डोकेदुखी (Headache) जाणवू लागते. अशावेळी काही सेकंदासाठी किंवा मिनिटासाठी आपला मेंदू सुन्न( brain freeze) होऊन जातो परंतु अशा प्रकारचा त्रास आपल्याला का उद्भवतो ?,असा अनेकदा मनामध्ये प्रश्न सुद्धा निर्माण होतो. या समस्येवर तज्ञ मंडळी सांगतात की, ही काही वेळेसाठी जाणवणारी समस्या असते .

जेव्हा कधी आपण खूपच जास्त थंड पदार्थ सेवन करतो, अशावेळी अशा प्रकारची डोकेदुखी प्रामुख्याने जाणवते. अशा प्रकारच्या घटना सहसा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाहायला मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात गरमी खूप असते. या गरमीत सगळीकडे उकडत असताना व्यक्तीला खूपच थंड खावेसे वाटते. परंतु आईसक्रीम खाल्ल्यावर असे नेमके का घडते. चला तर मग जाणून घेऊया या बद्दल….

झिणझिण्या जितक्या लवकर जाणवतात, तितक्याच लवकर गायब

हार्वर्ड मेडिकल स्‍कूल (Harvard Medical School) येथील वैज्ञानिकांनी असे नेमके का घडते? याबद्दल एक रिसर्च सुद्धा केलेला आहे.  मेडिकल न्‍यूज टुडे यांच्या रिपोर्ट नुसार , फक्त आईसक्रीमच नाही तर जेव्हा कधी आपण एखादी थंड पदार्थ खातो, अशा वेळी या थंडपणामुळे आपल्या नसांमध्ये एक वेदना निर्माण होते. ज्या कारणामुळे व्यक्तीच्या मेंदूमध्ये झिनझिण्या जाणवतात. यालाच मेंदू सुन्न होणे असे देखील म्हटले जाते. अशा प्रकारच्या झिणझिण्या जितक्या लवकर जाणवतात, तितक्याच लवकर गायब सुद्धा होतात.

गरम पाणी पिणे

मेंदू सुन्न होणे या संदर्भात केले गेलेल्या एका रिसर्च मध्ये अनेक मुद्दे सांगण्यात आलेले आहे. या रिसर्चनुसार,जेव्हा आपण आईसक्रीम किंवा एखाद्या थंड पदार्थ खातो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही तरी वेदना जाणवू लागतात असे घडण्यामागे काही कारणे देखील आहेत. आपल्या मेंदूच्या सेरेब्रल आर्टरी मध्ये अचानकपणे रक्तप्रवाह वाढतो आणि काही वेळेनंतर जश्या जश्या आपल्या नसा पुन्हा पूर्वीच्या स्थितीमध्ये येऊ लागतात, अशा वेळी आपली डोकेदुखी नॉर्मल होऊन जाते. रिसर्च दरम्यान ज्या लोकांना ब्रेन फ्रिज म्हणजेच मेंदू सुन्न होण्याची समस्या आढळून आली होती,अशा लोकांना बरे करण्यासाठी गरम पाणी प्यायला दिले होते.

गरम पाणीचा शेक

तज्ञ मंडळी यांच्या मते ,मेंदू सुन्न झाल्यावर व्यक्तीने कोमट किंवा गरम पाण्याने गुळण्या करायला पाहिजे. तोंडातील प्रत्येक भागाला गरम पाणीचा शेक मिळाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये गरम हवेचे सर्कुलेशन वाढते.यामुळे मेंदू सुन्न होण्याच्या समस्येपासून आपल्याला सुटका मिळते.अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात उद्भवू नये म्हणून जास्त थंड पदार्थ अजिबात सेवन करू नये.

थंड पदार्थ चुकूनसुद्धा खाऊ नये

तज्ञ मंडळी असे सुद्धा सांगतात की, ज्या व्यक्तींना मायग्रेन आजार झालेला आहे. या व्यक्तींनी जर जास्त प्रमाणात थंड असलेल्या वस्तू पदार्थ सेवन केले तर त्यांचा मेंदू सुन्न होण्याची समस्या अजून वाढून यामुळे भविष्यात मेंदूला धोका देखील होऊ शकतो. आपल्या मेंदूमधील रक्तप्रवाह गती वाढल्यामुळे अशा प्रकारची स्थिती निर्माण होते.जर तुम्हाला वाटत असेल कि, अशा प्रकारची डोकेदुखी भविष्यात उद्भवू नये म्हणून जास्त थंड पदार्थ चुकूनसुद्धा खाऊ नये.

संबंधित बातम्या

तुमच्या हातातील मोबाईलने होऊ शकतो घात, जाऊ शकते तुमची नोकरी!

Health Tips: मधुमेह असणाऱ्यांनी काजूचे सेवन करा; तुम्हाला मिळू शकतात हे फायदे

Multiple Sclerosis : मल्‍टीपल स्क्लेरोसिस या गंभीर आजाराचे प्रकार जाणून घ्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.