मासिक पाळी सुरु झाल्यावर मुलींची उंची का वाढत नाही ? जाणून घ्या, कोणत्या कारणांमुळे मुलींची उंची वाढणे थांबते!

तुमची उंची तुमचे व्यक्तिमत्त्व वाढवण्याचे काम करते. बऱ्यापैकी उंची तुम्हाला चांगले व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास देते. त्यामुळे मुलींचे सौंदर्यही वाढते, पण मुलींची उंची वाढणे मुलांपेक्षा लवकर थांबते. यामागे अनेक कारणे असू शकतात. मुलींच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे त्यांची उंची 14 ते 15 वर्षे वयानंतर कमी होते.

मासिक पाळी सुरु झाल्यावर मुलींची उंची का वाढत नाही ? जाणून घ्या, कोणत्या कारणांमुळे मुलींची उंची वाढणे थांबते!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 9:24 PM

मुलांपेक्षा मुलींची उंची वाढणे लवकर थांबते. यामागे अनेक कारणे आहेत. मुलींच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे (due to hormonal changes) त्यांची उंची वाढण्याचे प्रमाण 14 ते 15 वर्षे वयानंतर कमी होते. बालपणात मुलींची उंची खूप वेगाने वाढते आणि वयात येताच त्यांची उंची वाढण्याचे मंदावते. वयाच्या 14 ते 15 वर्षे किंवा मासिक पाळी (Menstrual cycle) सुरू झाल्यावर मुलींची उंची झपाट्याने वाढणे थांबते. अशा परिस्थितीत तुमच्या मुलीची किंवा कोणत्याही मुलीची उंची खूप कमी असेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या चांगल्या बालरोगतज्ञांना भेटून मुलीच्या उंचीबद्दल चर्चा करून सल्ला घणे आवश्यक आहे. मासिक पाळी सुरू होण्याच्या एक-दोन वर्षे आधी, मुलींच्या उंची वाढण्याचे प्रमाण (Height gain rate) खूप जास्त असते. बहुतेक मुलींमध्ये वयाच्या 8 ते 13 व्या वर्षीच यौवनावस्थेस प्रारंभ होतो, आणि त्यांची उंची 10 ते 14 वर्षांच्या दरम्यान वेगाने वाढते.

का थांबते उंचीची वाढ

मासिक पाळीच्या पहिल्या कालावधीच्या एक किंवा दोन वर्षानंतर, त्या फक्त 1 ते 2 इंच वाढतात. या दरम्यान मुली प्रौढ(अंतिम उंची) उंचीपर्यंत सहज पेाहचतात. अनेक मुली 14 ते 15 वर्षांच्या वयापर्यंत त्यांची प्रौढ उंची गाठतात. तुमच्या मुलीची किंवा कोणत्याही मुलीची मासिक पाळी कधी सुरू होत आहे. यावर अवलंबून काही मुली लहान वयातच त्यांची प्रौढ उंची गाठू शकतात. जर तुमच्या मुलीला वयाच्या 15 व्या वर्षीही मासिक पाळी सुरू झाली नसेल, तर त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

स्तनाचा आकार वाढणे आणि यौवनाचा संबंध काय?

स्तनाचा आकार वाढणे हे बहुधा यौवनाचे लक्षण असते. कोणत्याही मुलीची मासिक पाळी सुरू होण्याच्या 2 वर्षे आधी स्तनाचा आकार वाढू लागतो. काही मुलींमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर एक वर्षानंतरच ब्रेस्ट बड्स दिसू लागतात. त्याच वेळी, काही मुलींमध्ये, मासिक पाळीच्या तीन ते चार वर्षानंतरही स्तनांच्या आकाराचा विकास सुरू होत नाही.

हे सुद्धा वाचा

मुली मुलांपेक्षा वेगाने वाढतात का?

मुलींपेक्षा मुलांमध्ये तारुण्य नंतर सुरू होते. सर्वसाधारणपणे, मुलांमध्ये तारुण्य 10 ते 13 वर्षांच्या दरम्यान सुरू होते आणि 12 ते 15 वर्षांच्या वयातच विकसित होते. याचा अर्थ मुलींमध्ये वाढ झाल्यानंतर दोन वर्षांनी मुलांमध्ये वाढ सुरू होते. बहुतेक मुले वयाच्या 16 व्या वर्षी उंची वाढणे थांबवतात, परंतु त्यांचे स्नायू वाढू शकतात.

मुलींची सरासरी उंची किती आहे?

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, 20 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढ महिलांची सरासरी उंची 63.7 इंच आहे. जे फक्त 5 फूट 4 इंच आहे.

उंचीमध्ये आनुवंशिकता कोणती भूमिका बजावते?

मुलाची उंची सहसा पालकांच्या उंचीवर अवलंबून असते. पालकांच्या उंचीमुळे मुलाची उंचीही लांब असल्याचे अनेकदा दिसून येते. मुलाच्या कमी उंचीबद्दल तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर ते आधी पालकांच्या उंचीबद्दल विचारतात.

उंची वाढण्यास उशीर होण्याची कारणे

कुपोषणापासून ते औषधांपर्यंत, तुमच्या वाढीवर परिणाम करणारी अनेक कारणे आहेत. काही मुलींमध्ये, ग्रोथ हार्मोन समस्या, संधिवात किंवा कर्करोग यांसारख्या विविध रोगांमुळे वाढीस विलंब होऊ शकतो. विलंबित वाढीमध्ये जीन्स देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.

(टीप – वरील बातमी उपलब्ध माहितीच्या आधारे घेतली आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्ठी करत नाही. तज्ज्ञांकडून माहितीची खातरजमा करून घ्यावी.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.