झोपता झोपता वजन कमी करता येऊ शकतं?; झोप आणि वजनाचा संबंध काय?

| Updated on: Sep 23, 2021 | 7:39 AM

वाढतं वजन हे अनेक आजारांना आमंत्रण देत असतं. वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, ब्लड शुगर, हृदयाशी संबंधित आजार, गुडघ्यांमध्ये वेदना होणं आदी आजार होऊ शकतात. (Why Is Sleep So Important to Weight Loss?)

झोपता झोपता वजन कमी करता येऊ शकतं?; झोप आणि वजनाचा संबंध काय?
Sleep Weight Loss
Follow us on

नवी दिल्ली: वाढतं वजन हे अनेक आजारांना आमंत्रण देत असतं. वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, ब्लड शुगर, हृदयाशी संबंधित आजार, गुडघ्यांमध्ये वेदना होणं आदी आजार होऊ शकतात. जगभरातील लोक आपलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तुम्हीही त्यासाठी मेहनत करत असाल. तरीही शरीरातून फॅट का जात नाही? त्यासाठी तुमची झोप जबाबदार असू शकते. चांगल्या आणि गाढ झोपेमुळे तुमचे वजन कमी होऊ शकते, असं अनेक संशोधनातून पुढे आलं आहे. (Why Is Sleep So Important to Weight Loss?)

गाढ झोपेने वजन कमी होतं

तुम्ही जर 7 ते 8 तासांची कोणत्याही व्यत्यया विना गाढ झोप घेतल्यास तुमचं वजन कमी होतं, हे आता सिद्ध झालं आहे. गाढ झोपेमुळे तुमचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. त्यामुळे तुमच्या शरीरात अधिक फॅट राहत नाही.

चांगल्या मेटाबॉलिज्ममुळे अधिक कॅलरीज जाळण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन तयार होतो. त्यामुळे भूक वाढते आणि झोपेच्या कमतरतेमुळे फूड क्रेविंगही होते. तुम्ही तुमच्या क्रेविंगवर कंट्रोल करत नाही. अधिक खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढू लागतं.

1. झोपण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

कॅमोमाईल टीचं सेवन करा:

झोपण्यापूर्वी एक कपभर गरम कॅमोमाईल टी प्या. त्यामुळे चांगली झोप लागते. कॅमोमाईल टीमुळे शरीरातील ग्लाइसिनचा स्तर वाढतो. त्यामुळे झोप येते. त्यामुळे ही टी प्याच. मग बघा झोपता झोपता तुमचं वजन कसं कमी होतं.

मोबाईल लांब ठेवा:

झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा अन्य गॅझेट्सचा वापर करणं हानिकारक असल्याचं अनेक शोधातून दिसून आलं आहे. त्यातून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे तुमच्या स्लीप हार्मोन मेलाटोनिनचा स्तर कमी करतात. मेलाटोनिन कमी होताच तुमची भूक वाढते आणि एक्स्ट्रा कॅलरीजमुळे वजन वेगाने वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करू नका.

अंधारात झोपा:

स्लीप हार्मोन मेलाटोनिन शरीरात ब्राऊन फॅट उत्पन्न करते. त्यामुळे एक्स्ट्रा कॅलरी बर्न होतात. जर तुम्ही अंधारात झोपाल तर शरीर अधिक मेलाटोनिनचा संचार करेल. त्यामुळे वजन कमी होण्यास मदतच होईल. त्यामुळे नाईट बल्ब किंवा लॅम्प लावून झोपण्याऐवजी अंधार करून झोपा.

घरात मिन्टचा सुगंध दरवळू द्या:

झोपण्यापूर्वी रुममध्ये मिंटचा सुगंध असलेला स्प्रे करा. उशीला मिंट ऑईल लावून झोपा. जर्नल ऑफ न्यूरॉलॉजी अँड ऑर्थोपेडिक मेडिसीनच्या अभ्यासानुसार मिंटच्या सुगंधामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोनदा त्याचा सुगंध घेतल्यास तुमचं वजन कमी होईल.

2. झोपताना या गोष्टी लक्षात ठेवा

झोपण्याची योग्य पद्धत:

झोपताना पाठिवर झोपणे सर्वात चांगलं आहे. त्यामुळे पाय मोडून किंवा पोटावर झोपणं बंद करा. तुम्ही पाय उघडून डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपू शकता.

रुम थंड असावा:

झोपता झोपता वजन कमी करायचं असेल तर रुम थंड ठेवा. डायबेटिक जर्नलनुसार, जर तुमची खोली थंड राहिली तर तुमचं शरीर स्वत:ला उष्ण ठेवण्यासाठी फॅटचा वापर करतं. त्यामुळे झोपताना तुमचं एक्स्ट्रा फॅट बर्न होतं. त्यामुळे वेगाने वजन घटतं. (Why Is Sleep So Important to Weight Loss?)

 

संबंधित बातम्या:

Covishield vaccine : भारताच्या दबावासमोर ब्रिटन झुकला, कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी, मात्र एका अटीने अडचण

Healthy Heart : निरोगी हृदयासाठी आहारात ‘हे’ 6 पदार्थ समाविष्ट करा!

Dental Tips : दातदुखीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, त्वरीत आराम मिळेल!

(Why Is Sleep So Important to Weight Loss?)