कोरोनामुळे का वाढतंय हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण? एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले कारण

कोरोना महामारीदरम्यान अनेकांचा हृदयविकारांच्या झटक्याने निधन झाले. आता कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी देखील त्याचे परिणाम आजही लोकांना भोगावे लागत आहे. कोविडनंतर हृदयविकाराच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झालीये. या मागचं कारण एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

कोरोनामुळे का वाढतंय हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण? एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले कारण
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 8:34 PM

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवलं. अनेक लोकांचा जीव गेला. अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली. कोरोनानंतर अनेक लोकांनी त्यांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचं सांगितलं. त्यापैकीच एक म्हणजे हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. एम्समध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय औषध विज्ञान परिषदेत तज्ज्ञांनी असा दावा केला. या प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मेंदूमधून बाहेर पडणारे कॅटेकोलामाइन हार्मोन्ससह ऑक्सिडेटिव्ह ताण आहे.

ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो

एन प्रोटीन हे शरीरात AC 2 द्वारे नियंत्रित केले जातात. पण जेव्हा शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूमधून कॅटेकोलामाइन हार्मोन्स बाहेर पडतात. याचं काम हृदयावर नियंत्रण ठेवण्याचे असते. परंतु जर जास्त प्रमाणात ते हार्मोन्स सोडले गेले तर हृदयाचे पंपिंग थांबवते, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.

दिल्ली फार्मास्युटिकल सायन्सेस आणि रिसर्च युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. रमेश गोयल यांनी यावेळी सांगितले की, कोविड एंजियोटेन्सिन-कन्व्हर्टिंग एंझाइम 2 (ACE2) वर परिणाम करत आहे. यामुळे साइटोकिन्सची संपूर्ण रचना बदलतेय.

“यामुळे, शरीरात सायटोकायनेसिस किंवा इन्फ्लॅमेटरी मार्कर अचानक वाढतात. ज्याचा परिणाम रक्त घट्ट होऊ लागते. त्यानंतर हृदयाच्या नसांवर दबाव येतो आणि मग हृदयविकाराचा झटका येतो.”

कोविडमुळे होतो फायब्रोसिस

डॉक्टर गोयल म्हणाले की, कोविडमुळे होणाऱ्या फायब्रोसिसमुळे शरीरातील यंत्रणेत बिघाड होता. काही लोकं याला लाँग कोविड म्हणतात. यासाठी जीनोमचे विश्लेषणही आवश्यक आहे. फायब्रोसिसमध्ये एसीईची पातळी सतत तपासली गेली पाहिजे. दीर्घकाळ कोविड, ॲट्रियल फायब्रिलेशनमुळे हृदयाचे स्नायू नीट कार्य करत नाहीत. ज्यामुळे अचानक जीव गमवावा लागू शकतो. याची अनेक कारणे असू शकतात. प्रदूषण हे देखील यामागचे कारण आहे.

एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. आनंद कृष्णन यांनी सांगितले की, 55% रुग्णांना हृदयविकाराचे गांभीर्य समजू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हृदयविकाराची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब रुग्णालयात पोहोचणे महत्त्वाचे असते. ज्यामुळे जीव वाचण्याची शक्यता वाढते. जेव्हा जेव्हा छातीत दुखते तेव्हा लगेच काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांना दाखवले पाहिजे. कारण समस्या वाढण्याआधीच त्यावर उपचार घेतलेले कधीही चांगले. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. कोणतीही लक्षणे आढळली की डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.