Health | तुम्हाला ही झोपताना छातीशी उशी घेण्याची सवय? जाणून घ्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट!

तुम्हाला ही झोपताना छातीशी उशी घेऊन झोपण्याची सवय आहे? असे करणारे तुम्ही एकटेच नाही आपल्यापैकी अनेकजण असे आहेत की त्यांना ही सवय आहे बहुतेक वेळा रात्री झोपतांना आपल्यापैकी अनेकांना सोबत उशी हवी असते. अनेकांच्या झोपण्याच्या सवयीमध्ये उशीला महत्त्वाचे प्राधान्य दिले जाते. त्यांचे असे वागणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्व मधील एक गुण दर्शवीत असतो आणि म्हणूनच त्याचा परिणाम त्यांच्या रिलेशनशिप आणि नाते हाताळण्याच्या पद्धतीवर सुद्धा होत असतो म्हणून आज आपण या सवयी बद्दल जाणून घेणार आहोत तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वावर कशा प्रमाणे परिणाम होतो हे सुद्धा जाणून घेणार आहोत.

Health | तुम्हाला ही झोपताना छातीशी उशी घेण्याची सवय? जाणून घ्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 2:19 PM

प्रत्येक व्यक्तीच्या झोपण्याची सवय (Sleeping Habits) व पद्धत वेगळी असते. काही जणांना पाठीवर झोपायला आवडते तर काही जणांना डाव्या बाजूला तोंड करून किंवा उजव्या बाजूला तोंड करून झोपणे आवडत असते. तसं पाहायला गेले तर व्यक्तीच्या शरीरावरून, बोलण्या – चालण्याच्या पद्धतीवरून, चेहऱ्याच्या भाव वरून त्याच्या सर्व व्यक्तिमत्त्वाचा (Personality) अंदाज लावला जातो आणि म्हणूनच अशा वेळी व्यक्तीच्या झोपण्याच्या सवयीबद्दल सुद्धा अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचे निरीक्षण करून अनेक संशोधन सुद्धा करण्यात आलेले आहेत. परंतु ठोस असा काही पुरावा अद्यापही प्राप्त झाला नाही. परंतु या सगळ्या निरीक्षणामुळे आपण एका गोष्टीचा अंदाज लावू शकतो की या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतः किंवा इतरांच्या सवयीबद्दल एकमेकांना समजू तरी शकतो.

आतापर्यंत आपण झोपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती व प्रकार जाणून घेतलेले आहे परंतु एक पद्धत तुम्हाला माहितीच असेल की अनेक जण रात्री झोपताना छातीशी उशी घेऊन झोपतात. ही एक साधारण पद्धत आहे आणि आपल्यापैकी अनेकजण ही पद्धत झोपताना वापरत असतात. ही सवय लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, लहान मुलींपासून ते महिलामध्ये ही सवय पाहायला मिळते. यामागे अनेक असे वेगवगळे कारण पाहायला मिळतात.ज्यात व्यक्तीचे कम्फर्ट आणि आराम करण्याच्या गरजा कारणीभूत ठरतात. खरंतर ही गोष्ट आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सुद्धा एक महत्त्वाची सूचना देत असते. याचा संबंध नातेसंबंधांवर सुद्धा होताना पाहायला मिळतो तसेच एखादी गोष्ट आपल्याला जवळची असेल अशा वेळी आपण त्या वस्तू सोबत खूप स्पेशल असे फील करत असतो.

नाते संबंध यांना महत्व देणारा

जर तुम्हीसुद्धा उशी छातीशी घेऊन झोपत असाल तर यावरून तुम्ही स्नेही व प्रेमळ व्यक्ती आहात असे दिसून येते. हगिंग पिलो स्लीपिंग साइकलॉजी’ नुसार असे करणारे लोक त्यांच्या जीवनामध्ये नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात आणि प्रत्येक नाते अगदी काळजीने आणि स्नेहसंबंधाने जपत असतात. प्रत्येक नातेसंबंधामध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती जीव ओतून प्रेम व्यक्त करत असतात.

लाजाळू स्वभाव

या लेखात ‘पिलो हगर’ पुस्तकात व्यक्तीबद्दल खूप सार्‍या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे, त्यानुसार एखादी व्यक्ती जर उशीला मिठीत घेऊन झोपत असेल तर ती व्यक्ती खूपच लाजाळू स्वभावाची आहे हे स्पष्ट होते. या व्यक्तींना इतरांमध्ये मिसळण्यास वेळ लागतो. त्यांच्यासाठी इतरांमध्ये लवकर मिसळणे खूपच कठीण होऊन बसते. अशा व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत लाजण्याची सवय असते. आपल्या मनातील भावना इतरांना सांगण्यास या व्यक्तींना खूप वेळ लागतो तसेच अशा प्रकारच्या व्यक्ती आपले म्हणणे इतरांपर्यंत लवकर पोहोचवत नाही. यावरूनच एक गोष्ट निदर्शनास येते की, या प्रकारच्या व्यक्ती आपल्या भावना इतरांपेक्षा पोचवण्यापेक्षा उशीला मिठी देऊन ते प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

काय फायदा?

‘द बेनेफिट्स ऑफ कडलिंग विद इनएनिमेट ऑबजेक्ट्स एट नाइट’ मध्ये फ्लोरिडा बेस्ड क्लीनिकल साइकलॉजिस्ट स्टेफनी सिल्बरमैन यांनी सांगितले की , झोपताना छातीशी उशी घेऊन झोपल्याने आपल्याला खूप प्रकारचे फायदे प्राप्त होतात. साइकलॉजिकली नुसार व्यक्तीला सुरक्षिततेची भावना आणि सुरक्षता देते. अशामुळे व्यक्तीला आपल्याला होणारा त्रास भीती या सर्व गोष्टी दूर होऊन एक कुठेतरी चांगली भावना मनामध्ये जाणवू लागते आणि सहज व आरामदायी भावना मनामध्ये निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींना रात्री झोप सुद्धा चांगली लागते.

चुकीचे नाही काही…

सिल्बरमैन नुसार , ही सवय आपल्यापैकी अनेकांना लहानपणापासूनच लागलेली असते. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर मोठे झाल्यावर बाळाला गर्भाशयात ज्याप्रकारे आखडून झोपायची सवय असते तशीच सवय बाहेर आल्यावर सुद्धा मुलांना असते म्हणूनच या कारणामुळे मुले अनेकदा रात्री झोपताना एखाद्या खेळणे सोबत किंवा एखाद्या टेडीबिअर जर आपल्याकडे असेल तर ते टेडीबिअर सोबत घेऊन झोपतात. हीच सवय अनेकांना मोठे झाल्यावर सुद्धा सोडवत नाही. ही सवय आपल्या जीवनाचा व झोपण्याचा एक प्राधान्यक्रम बनून जातो. म्हणूनच जर तुम्ही मोठे झालेले आहात आणि तुम्ही सुद्धा अशा पोझिशनमध्ये झोपत असाल तर ही सवय वाईट नसून तुमच्या सवयीचा एक भाग आहे म्हणूनच अशा सवयी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करणे गरजेचे नाही.

संबंधित बातम्या :

PHOTO | मासे खाल्ल्यानेही होऊ शकते नुकसान, बळावतात हे आजार; जाणून घ्या याबाबत अधिक माहिती

Child health: लहान मुलांच्या डोक्याचा आकर का वाढतो ? काय आहे या आजारामागील कारण!!

तुम्हाला माहितीय का, कोणत्या 5 सवयींनी किडनी होते फेल…!

पाहा ताज्या बातम्या :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.