Women’s health | महिलांनो…चांगल्या आरोग्यासाठी ‘या’पध्दतीने दररोजच्या आहारात व्हिटॅमिन्सचा समावेश करा!
व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्याने हाडे कमकुवत होण्यास सुरूवात होते. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये जास्त वेळ बसा. तसेच व्हिटॅमिन डीसाठी अंडी, ओटस, चीज, दूध आणि मशरूम यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
मुंबई : महिलांना (Womens) निरोगी राहण्यासाठी भरपूर पोषक आणि जीवनसत्त्वे आवश्यक असतात. खराब जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे महिलांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वयाच्या तिशीनंतर महिलांना आरोग्याच्या असंख्य समस्या (Problem) निर्माण होतात. यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. चांगला आहार, व्यायाम हे महिलांसाठी खूप आवश्य़क आहे. घरातील सर्वांची काळजी घेण्याच्या नादामध्ये अनेक वेळा महिला आपल्याच आरोग्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, पायदुखी, साधेदुखी यासारख्या समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. यामुळे महिलांनी आपल्या आहारामध्ये सर्वच प्रकारची व्हिटॅमिन (Vitamins) घ्यायला हवीत.
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्याने हाडे कमकुवत होण्यास सुरूवात होते. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये जास्त वेळ बसा. तसेच व्हिटॅमिन डीसाठी अंडी, ओटस, चीज, दूध आणि मशरूम यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी खूप जास्त आवश्यक असते. जर शरीरामध्ये व्हिटॅमिन ईची कमतरता झाली तर त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. शिवाय आपली त्वचा निस्तेज होण्यास सुरूवात होते. यामुळे महिलांनी त्यांच्या आहारात व्हिटॅमिन ई समाविष्ट करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन ई त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याचे काम करते. हे सुरकुत्या आणि डागांची समस्या देखील दूर करते.
व्हिटॅमिन के
व्हिटॅमिन के महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. कधीकधी मासिक पाळी दरम्यान खूप रक्तस्त्राव होतो. बाळंतपणातही अनेक वेळा अतिरक्तस्रावाच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत व्हिटॅमिन के या समस्येपासून मुक्ती देण्याचे काम करते. आपण आहारात हिरव्या भाज्या आणि सोयाबीन तेल यांसारखे व्हिटॅमिन के समृद्ध असलेले अनेक प्रकारचे पदार्थ समाविष्ट करू शकता. यामुळेच महिलांनी दररोजच्या आहारामध्ये किमान दोन हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.