Malaria Vaccine | मलेरियाच्या लशीला WHO ची मंजुरी, एका डोसमुळे आजार संपणार?
Malaria new vaccine : | दरवर्षी कोट्यावधी लोक मलेरियामुळे आजारी पडतात. मच्छर चावल्यामुळे हा आजार होतो. आता जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला मान्यता दिलीय. मलेरिया विरुद्ध ही लस प्रभावी ठरेल.
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला मंजुरी दिलीय. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलीय. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच सुद्धा या लसीमध्ये योगदान आहे. मलेरियावरील ही दुसरी व्हॅक्सीन आहे. या व्हॅक्सीनला R21/Matrix-M नाव देण्यात आलय. ही व्हॅक्सीन पहिल्या व्हॅक्सीनच्या तुलनेत जास्त प्रभावी असल्याच म्हटल जातय. ही लस मुलांवर जास्त प्रभावी आहे. या व्हॅक्सीनची आता निर्मिती सुरु होईल. मलेरियाच्या पहिल्या लसीला वर्ष 2021 मध्ये मंजुरी मिळाली होती. याला आरटीएसएस नाव देण्यात आलं होतं. आता मलेरियाच्या दुसऱ्या लसीला मंजुरी मिळालीय. ही लस मलेरियाचा आजार संपवेल का? या बद्दल एक्सपर्ट्सच काय म्हणणं आहे.
जीटीबी हॉस्पिटलचे डॉ. अंकित कुमार म्हणाले की, R21/Matrix-M व्हॅक्सीन थेट स्पोरोजोइट्सवर परिणाम करते. हे स्पोरोजोइट्स मलेरियाच्या इन्फेक्शनचे एंट्री पॉइंट्स आहेत. मलेरियाच्या व्हायरसने शरीरात प्रवेश करताच ही व्हॅक्सीन सुरुवातीलाच व्हायरसला संपवेल. एखादी लस आजाराचा प्रभाव सुरुवातीलाच संपवणार असेल, तर ते खूपच चांगलं आहे. सध्या ही लस आफ्रिकी देशांमध्ये वापरली जाईल. सध्या लहान मुलांसाठी या लसीला मान्यता देण्यात आलीय. “मलेरियाची जी पहिली लस आली होती, त्यापेक्षा आर 21 जास्त प्रभावी आहे. ट्रायलमध्ये जास्त फायदा दिसून आला. व्हॅक्सीनचे कमीत कमी दोन डोस घेण्याची आवश्यकता आहे” असं डॉ. अंकित यांनी सांगितलं. कुठल्या मच्छरमुळे मलेरिया होतो?
सफदरजंग हॉस्पिटलमधील डॉ. जुगल किशोर यांनी सांगितलं की, “या व्हॅक्सीनच्या मदतीने मलेरियामुळे मृत्यूदर कमी करता येईल. खासकरुन लहान मुलांसाठी ही व्हॅक्सीन फायद्याची ठरेल” आफ्रिकेतील ज्या देशांमध्ये मलेरियाच प्रमाण जास्त आहे, तिथे याचा वापर सुरु करण्यात येईल. मलेरिया रोखण्यात ही व्हॅक्सीन 60 ते 70 टक्के प्रभावी ठरेल. मच्छर चावल्यामुळे मलेरियाचा आजार होतो. एनोफिलीज मच्छरच्या चावण्यामुळे हा आजार होतो. मलेरियाच्या तापात प्लेटलेट्स कमी होतात.