चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे उद्भवू शकते Hip Pain ची समस्या, टाळा या चुका !
बऱ्याच वेळेस दोन्ही हिप्स (पार्श्वभाग) ऐवजी एकाच बाजूला वेदना होऊ शकतात. वाढत्या वयासोबतच या वेदनांमध्येही वाढ होऊ शकते. अनेक वेळेस या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागू शकते.
नवी दिल्ली – बराच वेळ एकाच जागी बसून राहणे किंवा तासनतास उभे राहिल्यामुळे हिप्समध्ये ( पार्श्वभाग) वेदना होणे ही सामान्य बाब नव्हे. हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षणही असू शकते. सतत एकाच जागी बराच वेळ बसून काम करणे किंवा बसण्याची चुकीची पद्धत (wrong posture) यामुळे हिप्समधील वेदना आणखनीच वाढू शकतात. बऱ्याच वेळेस दोन्ही हिप्स (hips pain) ऐवजी एकाच बाजूला वेदना होऊ शकतात. वाढत्या वयासोबतच या वेदनांमध्येही वाढ होऊ शकते. अनेक वेळेस या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शस्त्रक्रियाही (surgery) करावी लागू शकते. कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा ताण पडल्यामुळेही पार्श्वभागात वेदना होऊ शकतात. आर्थ्रायटिसमुळे सांध्यामधील कार्टिलेज खराब होते त्यामुळेही पार्श्वभागामध्ये वेदना होऊ शकतात.
हिप्समध्ये वेदना नेमक्या का होतात, याची कारणे जाणून घेऊया.
(बसण्याची) चुकीची पद्धत
हेल्थलाइन नुसार, आपल्या हिप्समध्ये वेदना होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली बसण्याची चुकीची पद्धत. ऑफीसचे काम असो वा गाडीतून लाँग ड्राइव्हला जाणे असो, बसण्याची पद्धत चुकीची असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हिप्स आणि पाठीला पुरेसा आधार न देता बसल्यास हिप्सवर अधिक दाब पडू शकतो, ज्यामुळे वेदना होतात.
पाय क्रॉस करून बसणे अनेक लोकांना पाय क्रॉस करून बसण्याची सवय असते. मात्र असे केल्याने एका हिपवर अधिक दाब पडतो. तसेच आपले शरीर एका बाजूला कललेले राहते. अशा स्थितीत जास्त काळ बसल्यास हिप्समधील वेदना वाढू शकतात. तसेच झोपतनाही चुकीची पद्धत अवलंबली तर हिप्समध्ये वेदना निर्माण होऊ शकतात. जे लोक एकाच स्थितीत झोपतात त्यांची कंबर आणि हिप्समध्ये वेदना होऊन त्रास वाढू शकतो.
डॅमेज्ड हिप जॉईंट्स
जेव्हा पायाचे मोठे हाड हिप जॉईंट्सशी योग्यरित्या जोडलेले नसते तेव्हा हा त्रास उद्भवतो. जेव्हा हाडांमधील कार्टिलेज खराब होते तेव्हा हिप्स दुखण्याची समस्या सुरू होते. असे झाल्यास पायात अनेक वेळा तीव्र वेदना होऊ शकतात. बऱ्याच वेळेस बसताना व उठताना, हिप्सचे हाड वरच्या दिशेने कडक होते. ज्यामुळे हिप्सची हालचाल करताना त्रास होऊ शकतो. वेळा बसून उठताना, नितंबाचे हाड वरच्या दिशेने उठल्याने कडक होते, ज्यामुळे हिप हालचालीत समस्या उद्भवू शकतात.
आर्थ्रायटिसचा त्रास
चालताना, उभे राहताना आणि बसताना हिप्समध्ये वेदना होत असतील तर हे आर्थ्रायटिसचे लक्षणही असू शकते. आर्थ्रायटिसमुळे सांध्यामधील कार्टिलेज खराब होते ज्यामुळे हिप्समध्ये वेदना होऊ शकतात. आर्थ्रायटिसमुळे बऱ्याच वेळेस सांध्याना सूज येणे व तीव्र वेदना होणे, असा त्रासही उद्भवू शकतो.
(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)