Year Ender 2024: यंदाच्या वर्षी ‘या’ आजारांचा कहर, जाणून घ्या त्यांची नावे
Year Ender 2024: सध्या आपण 2024 वर्षाच्या अखेरच्या टप्प्यावर आहोत... यंदाच्या वर्षी अशा काही आजारांनी डोकं वर काढलं ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली... जाणून घेऊ यंदाच्या वर्षी भारतात कोणते नवीन रोग पसरले?
Year Ender 2024: 2020 मध्ये डोकं वर काढलेल्या कोरोना व्हायरसने फक्त भारतात नाही तर, संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. 2020 पासून ते 2022 पर्यंत जगभरातील अनेकांचे कोरोना व्हायरसने प्राण घेतले. ज्यामुळे जगात होत्याचं नव्हतं झालं होतं. पण कोरोना व्हायरसच्या हाहाकारानंतर लोकं अधिक स्वच्छता आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करु लगाली. पण यंदाच्या वर्षी देखील अशा अनेक आजारांनी डोकं वर काढलं ज्यामुळे 2024 मध्ये देखील अनेकांना प्राण गमवावे लागले…
2024 हे वर्ष आता शेवटच्या टप्प्यात आहे. या वर्षातील काही आजारांबद्दल सांगणार आहोत जे संस्मरणीय ठरले आहेत. आज आपण या वर्षी भारतात कोणते नवीन आजार पसरले आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. 2024 मध्ये भारतात देखील अनेक नवे आजार उदयास आले.
निपाह, झिका, क्रिमियन-काँगो रक्तस्त्राव ताप आणि कायसनूर वन रोगाचा उद्रेक एका दशकापासून नोंदवला जात आहे. एवढंच नाही तर, आपण कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करत आहोत. कोरोना व्हायरसची लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण झाली.
निपाह व्हायरस : एक झुनोटिक पॅरामीक्सोव्हायरस जो दक्षिणपूर्व आशियामध्ये स्थानिक आहे. या आजाराचा पहिला रुग्ण 2018 मध्ये भारतातील केरळ येथील आढळून आला. रिपोर्टनुसार, हा विषाणू वटवाघुळ किंवा डुकरांद्वारे पसरतो.
झिका व्हायरस : एडीस इजिप्ती द्वारे प्रसारित झाला. भारतात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण 2021 मध्ये आढळून आला. झिका व्हायरसच्या पहिल्या रुग्णाची नोंद केरळ याठिकाणी झाली.
क्रिमियन-काँगो रक्तस्त्राव ताप (CCHF): हा एक व्हायरस आहे, ज्याने गुजरात, राजस्थान, केरळ आणि उत्तर प्रदेश याठिकाणी हाहाकार माजवला.
चांदिपुरा व्हायरल : हा व्हायरस डास, टिक्स आणि वाळूच्या माश्यांद्वारे प्रसारित होणारा आजार आहे. भारतात पहिला प्रादुर्भाव 1965 मध्ये महाराष्ट्रात झाला.
डेंग्यू : यंदाच्या वर्षी अनेकांनी डेंग्यूचा सामना केला. एडिस इजिप्ती किंवा एडिस अल्बोपिक्टस द्वारे प्रसारित होणाऱ्या डेंग्यू आजाराचा पहिला रुग्ण भारतातील चेन्नई आढळून आले. 1780 मध्ये डेंग्यू पहिला रुग्ण भारतात आढळून आला.
भारतातील इतर व्हायरल : हंताव्हायरस, चिकनगुनिया विषाणू, मानवी एन्टरोव्हायरस -71 (EV-71), इन्फ्लूएंझा आणि गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARS) कोरोनाव्हायरस. भारतात नोंदवलेले बहुतेक उद्रेक देशाच्या पश्चिम भागात होतात.