थायरॉईडसाठी योगा : ‘या’ योगासनांमुळे ‘थायरॉईड’ वर मिळवता येते नियंत्रण.. जाणून घ्या, योगासनांचे प्रकार

‘थायरॉईड’ हा आजार नसून मानेमध्ये आढळणाऱ्या ग्रंथीचे नाव आहे. ही ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करते. आपण जे काही खातो, त्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम ही ग्रंथी करते. या ग्रंथीचे कार्य सुरूळीत राहावे यासाठी काही योगासने खुप उपयुक्त मानली जातात.

थायरॉईडसाठी योगा : ‘या’ योगासनांमुळे ‘थायरॉईड’ वर मिळवता येते नियंत्रण.. जाणून घ्या, योगासनांचे प्रकार
योगासणेImage Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 11:01 PM

‘थायरॉईड’ हा आजच्या काळात एक सामान्य आजार झाला आहे. थायरॉईड ही एक ग्रंथी आहे जी थायरॉईड संप्रेरक (Thyroid hormone) सोडते. थायरॉईड संप्रेरक आपल्या शरीरातील चयापचय नियंत्रित करण्यासाठी कार्य करते. जेव्हा थायरॉईड ग्रंथीमध्ये काही प्रकारचा अडथळा निर्माण होतो, तेव्हा ही ग्रंथी आवश्यकतेपेक्षा कमी-अधिक प्रमाणात हार्मोन्स सोडते. मग त्या व्यक्तीला ‘थायरॉईड’ शी संबंधित समस्या येतात. अशा स्थितीत वजन वाढणे किंवा कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, सांधेदुखी, अनियमित मासिक पाळी (Irregular menstruation) येणे, बद्धकोष्ठता इत्यादी सर्व प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. थायरॉईड ही ग्रंथी दोन प्रकारचे हार्मोन्स देखील तयार करते. एक T3 म्हणजे ट्रायओडोथायरोनिन आणि दुसरा T4 म्हणजे थायरॉक्सिन. जेव्हा हे दोन संप्रेरक असंतुलित (Hormonal imbalance) होतात, तेव्हा वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, ज्याला थायरॉईड म्हणतात. अशा परिस्थितीत काही योगासने तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

शीर्षासन

शीर्षासनासाठी जमिनीवर योगा चटई घाला. यानंतर गुडघ्यावर बसून वज्रासनाच्या मुद्रेत या. तुमच्या हाताची बोटे एकमेकांना जोडून त्यांना इंटरलॉक करा. यानंतर हात जमिनीवर ठेवा. तळवे अशा प्रकारे दुमडून घ्या की, ते एका कटोऱ्याच्या आकारात येतील. हळू हळू आपले डोके खाली वाकवा आणि तळहातांवर ठेवा. यानंतर तुमचे दोन्ही पाय हळू हळू वर करा आणि सरळ ठेवा. काही सेकंद या आसनात रहा. श्वासोच्छवास सामान्यपणे चालू ठेवा. त्यानंतर सामान्य स्थितीत या. हा व्यायाम तज्ञांच्या देखरेखीखाली करायला शिका, त्यानंतर घरी सराव करा. सुरुवातीला, तुम्ही भिंतीच्या मदतीने हा व्यायाम करू शकता.

सर्वांगासन

थायरॉईडसाठी सर्वांगासन खूप फायदेशीर मानले जाते. हे करण्यासाठी, योगा चटई घालून आपल्या पाठीवर झोपा. सामान्यपणे श्वास घ्या. हात जमिनीवर ठेवा आणि हळूहळू शरीर कंबरेपासून वर उचला. दोन्ही हात जमिनीवरून वर करा आणि पाठीला आधार द्या. दरम्यान, कोपर जमिनीवर ठेवा. कंबर आणि नितंब वर ठेवा आणि सर्व भार हात आणि खांद्यावर ठेवा. काही काळ या स्थितीत रहा. त्यानंतर सामान्य स्थितीत या.

हे सुद्धा वाचा

मत्स्यासन

यासाठी आसनावर पाठीवर झोपा आणि पद्मासनाच्या मुद्रेत पाय ठेवा. मांड्या आणि गुडघे जमिनीवर ठेवून, श्वास वरच्या दिशेने सोडा आणि छाती वर काढण्याचा प्रयत्न करा. डोक्याचा वरचा भाग जमिनीवर ठेवा. काही काळ या स्थितीत रहा. हळूहळू सामान्य स्थितीत परत या.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.