Weight Loss Tips: हिवाळ्यात वाढते वजन रोखण्यासाठी रोज खा ‘हे’ 5 पदार्थ

शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि फॅटी ॲसिड आढळतात, जे कॅलरीज बर्न करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याच्या सेवनाने वाढते वजन सहज नियंत्रित करता येते.

Weight Loss Tips: हिवाळ्यात वाढते वजन रोखण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 8:30 AM

नवी दिल्ली – वाढते वजन, लठ्ठपणा (obesity) ही आजकाल बहुतांश लोकांच्या जीवनातील समस्या बनली आहे. वजन कमी व्हावे (weight loss)यासाठी लोकं विविध उपाय करत असतात. काही जण महागडे डाएट करता तर काही जण जिममध्ये जाऊन कठोर मेहनत करत घाम गाळतात. त्यामध्ये काही लोक यशस्वीही ठरतात, त्यांचे वजन कमी होते. पण काही लोकांच्या पदरी निराशा येते. वाढत्या वजनावर (control the weight gain) नियंत्रण ठेवण्यासाठी वर्कआऊटसोबत डाएटवर विशेष लक्ष द्यावे लागते. विशेषत: हिवाळ्यात वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हिवाळ्यात या 5 गोष्टी खा.

गाजर खावे

हिवाळ्यात अनेक लोक गाजराचा हलवा मोठ्या आवडीने खातात. गाजरामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायबर उपयुक्त ठरते. यासाठी हिवाळ्यात गाजराचे सेवन केले जाऊ शकते. त्यामुळे पोटाची पचनक्रियाही सुरळीत राहते. यासोबतच वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. गाजरात व्हिटॅमिन-के, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन-ए आढळते.

हे सुद्धा वाचा

मुळ्याचे सेवन करा

मुळ्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात आढळते. तसेच फायबरही असते. मुळ्यामध्ये कॅलरीजही कमी असतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तुम्ही मुळ्याचा पराठी, मुळ्याचे लोणचे, मुळा आणि टोमॅटोचे सूप, मुळा आणि गाजराचे सॅलेड खाऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या खा

हिवाळ्यात विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या मिळतात. यामध्ये मोहरी, मेथी, पालक, मुळा, हरभरा आणि चाकवत यासह अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा समावेश आहे. हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. याच्या वापराने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते. यासाठी तुम्ही मुळा, चाकवत, पालक, मेथी इत्यादी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू शकता.

शेंगदाण्यांचे करावे सेवन

शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि फॅटी ॲसिड आढळतात, जे कॅलरीज बर्न करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याच्या वापराने वाढते वजन सहज नियंत्रित करता येते. यासाठी तुम्ही शेंगदाणा घातलेले पोहे, शेंगदाण्याचे चाट किंवा पीनट बटरचे सेवन करू शकता.

रताळं खा

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर हिवाळ्यात रताळ्याचे सेवन करू शकता. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. यासाठी डॉक्टरही लठ्ठपणाचा समान करणाऱ्या रुग्णांना रताळं खाण्याचा सल्ला देतात. याच्या सेवनाने पचनक्रियाही चांगली राहते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.