रोज तुळशीच्या 4 पानांचे सेवन केल्याने या समस्या राहतील दूर

दररोज तुळशीची 4 पाने खाल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

रोज तुळशीच्या 4 पानांचे सेवन केल्याने या समस्या राहतील दूर
तुळशीच्या पानांचे फायदे
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 5:26 PM

नवी दिल्ली – हिंदू धर्मात तुळस (tulsi) ही पूजनीय मानली जाते. लोक विधीवत तुळशीची पूजा करतात. आयुर्वेदातही तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. तुळशीमुळे आरोग्याला (health benefits) अनेक फायदे मिळतात. दररोज तुळशीच्या 4 पानांचे (eat 4 basil leaves daily) सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

बद्धकोष्ठता दूर होते तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज तुळशीच्या पानांचे सेवनही करू शकता.

हाडे मजबूत होतात तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट यासारखी पोषक तत्वे असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

सर्दी-खोकल्यावर गुणकारी

हवामानातील बदलामुळे अनेकदा आपल्याला सर्दी- खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. ते टाळण्यासाठी चहा किंवा काढ्याच्या रुपात तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. यामुळे आपल्या आरोग्याचे अनेक फायदे होतात. तुळशीची पाने छातीत सर्दी साचण्यापासून मदत करते.

हृदय स्वस्थ ठेवते

तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करणे आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरते.

ताण व चिंता

खराब जीवनशैलीमुळे अनेक लोक आजकाल तणावात असतात. अशावेळी तुळशीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ते चिंता आणि तणाव यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. रिकाम्या पोटी तुळस खाल्ल्याने ताण दूर होतो.

श्वासाचा दुर्गंध कमी करते

श्वासाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठीदेखील तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता.

कॅन्सर

तुळशीच्या पानांमध्ये असे गुणधर्म असतात जे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. तुळशीची पाने ही त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्यास मदत करते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.