How To Increase Platelets : डेंग्यू, मलेरियामुळे प्लेटलेट्स झाल्यात कमी ? या पदार्थांचे करा सेवन, होईल फायदा
सध्या डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप वेगाने वाढला आहे. अशा परिस्थितीत त्यापासून कसे वाचावे आणि प्लेटलेट्सची संख्या कशी वाढवावी ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : मान्सूनच्या काळात डेंग्यू, मलेरियाचा (dengue and malaria) प्रादुर्भाव वाढतो. डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया होऊ शकतो. ज्यामध्ये रक्तातील प्लेटलेट्सचे (Platelet count) प्रमाण कमी होऊ लागते. तसेच ही स्थिती अधिक गंभीर झाल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत, डेंग्यू किंवा मलेरिया झाल्यास औषधांसोबतच प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करता येईल ते जाणून घेऊया.
हायड्रेटेड रहा
अशा परिस्थितीमध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण घामामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. अशा वेळी भरपूर द्रव आहार घ्यावा, तसेच इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेय सेवन करावे. पाण्याव्यतिरिक्त तुम्ही नारळ पाणी, सूप आणि ताजे रस यांच सेवन करू शकता.
ही फळं खाऊ शकता
डेंग्यू किंवा मलेरियाने त्रस्त असलेले रुग्ण हे केळी, पपई, टरबूज, खरबूज यांसारखी मऊ फळे आहारात घेऊ शकतात. ती पचायला सोपी असतात आणि त्यात असलेली नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देते.
या भाज्या खाव्यात
डेंग्यू मलेरियाने त्रस्त असलेल्यांनी आहारात भोपळा, गाजर, पालक यांसारख्या सहज पचणाऱ्या भाज्यांचे सेवन करावे. यात भरपूर फायबर आणि लोह असते, ज्यामुळे प्लेटलेट्सची संख्या वाढते.
आलं खावं
आल्यामध्ये दाहक-विरोधी अर्थात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ते सेवन केल्याने मळमळ कमी होते तसेच आणि पचन सुधारते. अशावेळी आल्याचा चहा पिऊ शकता किंवा सूपमध्ये, भाजीमध्येही आलं किसून घालू शकता.
लसूण
लसणामध्ये देखील अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. अशा स्थितीत डेंग्यू किंवा मलेरियाने बाधित व्यक्तींनी त्यांच्या आहारात लसणाचा समावेश करणे आवश्यक आहे.
दही
दही हे आपले पाचन तंत्र ठीक करते, त्यामध्ये प्रीबायोटिक तत्व असतात, जी आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही दह्याचा आहारात अवश्य समावेश करू शकता.
व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ
लिंबूवर्गीय फळे, भोपळी मिरची, लिंबू, संत्री यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ सेवन करावे. त्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)