धूम्रपान सोडताना वेळकाळ पाहू नका… अशी मोडा सवय..
धूम्रपानाचे शरीराला अनेक अपाय आहेत. धूम्रपान केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्याच प्रमाणे फुप्फुसांशी संबंधित संधिसाधू आजार होण्याची शक्यताही वाढत असते. खोकल्याचा फारसा त्रास होतो, शिवाय हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो.
आपल्यापैकी अनेकांना धूम्रपान (smoking) करण्याची वाईट सवय असते. धूम्रपान करणे तरुणाईसाठी आजकाल ‘स्टाईल आयकॉन’च बनले आहे. बदलत्या आधुनिक ‘कल्चर’मध्ये धूम्रपान करणे ‘हाय लाइफस्टाइल’ (Lifestyle) समजली जात असते. धूम्रपानाबाबत समाजमनात अनेक समज आहेत. अनेक वर्षांपासून धूम्रपान करणाऱ्यांना असे वाटते की त्यांच्या शरीराचे यामुळे आधीच मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे आता सोडून काय होणार… बहुतेक वेळा ते धूम्रपानाची सवय (Habit) सोडण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. परंतु धूम्रपानामुळे अनेक आजार होतात. जेव्हाही तुमच्या मनात धूम्रपान सोडण्याविषयी विचार येईल त्या वेळी तुम्ही ते सोडणे योग्य ठरते. त्याचा शरीराला फायदा होईल. अनेक लोकांचा असाही समज असतो, की धूम्रपान न केल्याने आपण आजारी पडू, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.
वरिष्ठ फिजिशियन डॉ. कवलजीत सिंग यांच्या मते, हलके धूम्रपानही आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरत असते. जे लोक दिवसातून दोन किंवा तीन सिगरेट ओढतात. त्यांनाही याचा त्रास होतो. धूम्रपानामुळे कर्करोग, फुफ्फुसाचा संसर्ग, हृदय आणि ‘टीबी’सारखे गंभीर आजारही होतात. अनेक प्रकरणांमध्ये, धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग देखील होतो, ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. डॉ. सिंग यांच्या मते, धूम्रपानामुळे फुफ्फुसात निकोटीन जमा होते. त्यामुळे फुफ्फुसे खराब होऊ लागतात. यासोबतच हे ब्राँकायटिस, फुफ्फुसाचे इन्फेक्शन आणि घशाचे अनेक आजार निर्माण होऊ शकतात.
धूम्रपान सोडण्याचे अनेक फायदे आहेत
डॉ. सिंग यांच्या मते, धूम्रपान न केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य राहते. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित कोणताही आजार होण्याची शक्यता कमी असते. खोकल्याचा फारसा त्रास होणार नाही. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो. धूम्रपानाचे व्यसन कधीही सोडता येत असल्याने आपणास धूम्रपान सोडण्यास उशीर झालाय, हा न्यूनगंड न बाळगण्याचा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
असे सोडा धूम्रपान
धूम्रपान सोडण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू धूम्रपान कमी करावे. जर तुम्हाला सिगरेट ओढावीशी वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि इतर कामात व्यस्त रहा. धूम्रपान करावेसे वाटल्यास तुम्ही टॉफीदेखील चघळू शकता. सिगरेटचे व्यसन कायम राहिल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून समुपदेशन करून घेऊ शकता.
(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कृपया याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.)