मासिक पाळीच्या काळात तुम्हाला जास्त त्रास होतो? सावधान! असू शकतो ‘हा’ गंभीर आजार…

स्त्रियांना मासिक पाळी होणाऱ्या वेदना या एंडोमेट्रिओसिस नावाच्या आजाराचं लक्षण असू शकतं. या आजारात महिलांच्या गर्भाशयाच्या बाहेर गर्भाशयाच्या अस्तरांसारखी ऊती तयार होऊ लागते.त्यामुळे तुम्हाला जर अशी समस्या जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.

मासिक पाळीच्या काळात तुम्हाला जास्त त्रास होतो? सावधान! असू शकतो 'हा' गंभीर आजार...
periods pain
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:16 AM

मुंबई : मासिक पाळीच्या काळात महिलांना त्रास जाणवतो, हे नैसर्गिक आहे. पण हा त्रास जास्त जाणवत असेल, पुन्हा-पुन्हा घडते तेव्हा त्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. कारण हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकते. स्त्रियांना मासिक पाळी होणाऱ्या वेदना या एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) नावाच्या आजाराचं लक्षण असू शकतं. या आजारात महिलांच्या गर्भाशयाच्या बाहेर गर्भाशयाच्या अस्तरांसारखी ऊती तयार होऊ लागते.त्यामुळे तुम्हाला जर अशी समस्या जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या. गर्भाशयाचे हे ऊतक गर्भाशयाचे अस्तर बनवणाऱ्या ऊतकांप्रमाणेच विकसित होते आणि कार्य करते.

“जर एखाद्याला एंडोमेट्रिओसिस असेल तर आपल्याला अनेक लक्षणे दिसतात. मासिक पाळीत वेदना, सहा महिन्यांहून अधिक काळ ओटीपोटात वेदना, अनियमित रक्तप्रवाह, सूज, दीर्घकाळ थकवा या लक्षणांचा त्यात समावेश होतो. एंडोमेट्रिओसिस विकसित होण्यासाठी अनेक वर्षे लागतात आणि सुरुवातीच्या काळात आपल्याला हा आजार झाला आहे की नाही हे शोधणे खूप कठीण जाते.एंडोमेट्रिओसिसचे निदान करणे फार कठीण आहे. संशोधन असे सुचवते की एंडोमेट्रिओसिस शोधण्यासाठी सुमारे सात ते बारा वर्षे लागतात.”, असं अभ्यासक सांगतात.

एंडोमेट्रिओसिसची लक्षणं

मासिक पाळी आणि अनियमित मासिक पाळीच्या दरम्यान तीव्र वेदनांसह जास्त रक्तस्त्राव होणे, लघवी करताना वेदना, नेहमी थकल्यासारखे वाटणे, मासिक पाळी दरम्यान ओटीपोटाच्या भागात तीव्र वेदना ही या आजाराची लक्षणं आहेत. एंडोमेट्रिओसिस असलेल्या प्रौढ महिलांना सेक्स दरम्यान वेदना, गर्भधारणा न होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागतं. एंडोमेट्रिओसिसच्या निदान लक्षणांचं निदान आधारे लेप्रोस्कोपीद्वारे केलं जातं.

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना आणि अनेक रोग देखील असू शकतात. फायब्रॉइड्स, पेल्विक इन्फ्लामॅट्रॉय डिसीज किंवा एडेनोमायोसिस सारखे रोग कारण असू शकतात. फायब्रॉइड्समध्ये, गर्भाशयाचा आकार वाढू लागतो. मात्र, त्यातून कर्करोग होण्याची शक्यता नगण्य आहे. हा आजार बहुतेक 30-50 वयोगटातील महिलांमध्ये होतो आणि त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे नसतात. हा आजार 16 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलींमध्येही दिसून येतो.

टीप- टीव्ही 9 मराठी केवळ आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही.

संबंधित बातम्या

AC : उन्हाळ्यात एसीचा जास्त वापर करताय? सावधान! तुम्हाला ‘या’ गंभीर समस्यांचा सामना करायला लागू शकतो…

Health Tips : टोमॅटो आणि काकडीचा रस चेहऱ्यासाठी आहे खूपच उपयुक्त, जाणून घ्या फायदे…

Red Grapes : लाल द्राक्ष चेहऱ्यासाठी प्रचंड लाभदायी, जाणून घ्या फायदे…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.