उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या कोविड रुग्णांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक; इंग्लंडच्या संशोधकांचा दावा
उच्च रक्तदाब आणि मधूमेह असलेल्या तरूण कोरोना रुग्णांना ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका अधिक असल्याचं एका संशोधनात आढळून आलं आहे. (Young Covid Patients)
नवी दिल्ली: उच्च रक्तदाब आणि मधूमेह असलेल्या तरूण कोरोना रुग्णांना ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका अधिक असल्याचं एका संशोधनात आढळून आलं आहे. ब्रेन कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. कोरोना झालेल्या तरुण रुग्णांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचं आढळून आलं असून ही संख्या मोठी आहे. 267 रुग्णांवर केलेल्या संशोधनातून ही माहिती पुढे आल्याचं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. (Young Covid Patients With Hypertension, Diabetes Are At A Higher Risk Of Stroke Says Latest Research )
रुग्णांमध्ये सायकियाट्रिक प्रॉब्लेम
या 267 पैकी 50 टक्के रुग्णांमध्ये ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे एक सारखी होती. स्ट्रोकमुळे ब्रेन स्ट्रोक झाल्याचं आढळून आलं आहे. याबाबत इंग्लंडमधील हॉस्पिटल साऊथम्प्टन विद्यापीठातील संशोधक डॉ. एमी रोस रसेल हे संशोधन करत आहेत. कोव्हिड रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरॉलॉजिकल आणि सायकियाट्रिक प्रॉब्लेम आढळून आले आहेत. काही रुग्णांमध्ये तर ही दोन्ही लक्षणे आढळून आली आहेत. यावरून कोरोनाच्या एकाच रुग्णावर नर्व्हस सिस्टिमवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम झाल्याचं सिद्ध होत असल्याचं एमी रोस रसेल यांनी सांगितलं.
रक्त गोठल्यास ब्रेन स्ट्रोक
ज्या रुग्णांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास आहे, त्यांच्या शरीरातील अनेक भागात रक्त गोठल्याने रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्याचं दिसून आलं आहे. भारतातही अशी प्रकरणे आढळून आली आहेत. अशा प्रकारणात दीर्घकाळ रुग्णांवर त्याचा परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यात एन्स्फेलोपॅथी, कोमा आणि स्ट्रोकचाही समावेश आहे. त्याशिवाय मेंदूशी संबंधित काही आजारही रुग्णांमध्ये आढळून येत आहेत.
ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?
मेंदूला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी डॅमेज होते. तेव्हा ब्रेन स्ट्रोक होत असतो. किंवा ब्लॉकेज झाल्यानेही मेंदूला रक्त पुरवठा होत नाही. अशावेळी मेंदूला रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही.
मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यास मेंदूच्या कोशिका काही मिनिटातच संपुष्टात येतात. त्यामुळे रुग्णाला ब्रेन स्टोक येतो, असं अमेरिकेच्या सर्वात मोठी आरोग्य एजन्सी असलेल्या सीडीसीने म्हटलं आहे. (Young Covid Patients With Hypertension, Diabetes Are At A Higher Risk Of Stroke Says Latest Research )
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 2 August 2021 https://t.co/69iC03S1LQ #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021
संबंधित बातम्या:
सतर्क राहा, कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टअखेरीस येण्याची शक्यता : विजय वडेट्टीवार
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी घट, अॅक्टिव्ह केसेस मात्र वाढत्याच
(Young Covid Patients With Hypertension, Diabetes Are At A Higher Risk Of Stroke Says Latest Research )