Corona Vaccine | 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिलासा, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण

भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) 12 ते 18 वर्षे वयोगटासाठीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत.

Corona Vaccine | 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिलासा, कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 9:03 AM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) 12 ते 18 वर्षे वयोगटासाठीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात ही लस लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे लहान मुलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अल्पवयीन मुलाकडून कोर्टात याचिका

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. यानंतर आता सरकारकडून कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही तयारी केली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ही अतिधोकादायक असून त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी लवकरात लवकर कोरोना लसीकरण सुरु करा अशी मागणी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस कधी मिळणार असा सवाल करत थेट याचिका दाखल केली होती. या याचिकेला केंद्र सरकारने एका शपथपत्राच्या सहाय्याने उत्तर दिले आहे.

पुढील महिन्यात लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होणार

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिलाची लस येत्या ऑगस्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या कंपनीने गेल्या 1 जुलैला याबाबतची माहिती दिली होती. झायडस कॅडिलानं 12 ते 18 वर्षे वयोगटातील डीएनएवर आधारित असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लस ZyCoV-D ची निर्मिती केली आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायल नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुढील 45 ते 60 दिवसात ZyCoV-D लस उपलब्ध होईल. ही लस भारतीय औषध महानियंत्रकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.

तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झायडस कॅडिलानं 12 ते 18 वर्षे वयोगटातील लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या लसीला लवकरच परवानगी दिली जाणार आहे. त्यानुसार 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होईल.

(Zydus Cadila’s Covid vaccine for 12-18 year old get soon clinical trials done Centre government)

संबंधित बातम्या : 

8 ते 10 जिल्ह्यात अजूनही संसर्ग, 3 कोटी जादा डोस द्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.